'व्यथा'....(गझल)

'व्यथा'....(गझल)

मागून काय घ्यावे घेवून काय द्यावे.......
जे संपले कधीचे ते काळजास ठावे

दारावरी कधीचा येवून थांबलेला
संन्यास आसवांचा डोळ्यास आजमावे

हा सोहळा व्यथेचा पाहून गाव गेला
वेशीवरी कुणी का आयुष्य संपवावे ?

रेंगाळली जराशी ती मैफिलीत माझ्या
सूरात ओघळोनी मी धन्य धन्य व्हावे

शब्दास तोलणे हे मंजूर ना कधीही
घेवून पायवाटा जावे निघून जावे

ममता...

प्रतिसाद

शब्दास तोलणे हे मंजूर ना कधीही
घेवून पायवाटा जावे निघून जावे

वा...........

वा!!
जमलीये गझल!
जावे निघून जावे - आग्रह आवडला...

दारावरी कधीचा येवून थांबलेला
संन्यास आसवांचा डोळ्यास आजमावे

हा सोहळा व्यथेचा पाहून गाव गेला
वेशीवरी कुणी का आयुष्य संपवावे ?

खास! गझल आवडली.

छान..! जमलीये..

मागून काय घ्यावे घेवून काय द्यावे.......
जे संपले कधीचे ते काळजास ठावे

दारावरी कधीचा येवून थांबलेला
संन्यास आसवांचा डोळ्यास आजमावे ...............वा

हा सोहळा व्यथेचा पाहून गाव गेला
वेशीवरी कुणी का आयुष्य संपवावे ? .................वाह वा
ममता , छान..! गझल आवड्ली...

हा सोहळा व्यथेचा पाहून गाव गेला
वेशीवरी कुणी का आयुष्य संपवावे ?
छान..!

हा सोहळा व्यथेचा पाहून गाव गेला
वेशीवरी कुणी का आयुष्य संपवावे ? .................वाह वा
छान..! गझल आवड्ली...