~ प्रेम माझे साफ झाले ~

प्रेम माझे साफ झाले
जे तुझे ते माफ झाले

काळजाच्या भावनांना
मारण्याचे पाप झाले

राहिले ते दूर आता
नाव ज्याचे जाप झाले

सोडिले मी भूत मागे
वेदनेचे साप झाले

प्रेम व्याधी सांगताना
कालचेते बाप झाले

गंजला खंजीर आता
ध्येय सारे साफ झाले

- रमेश ठोंबरे

प्रतिसाद

तंत्रशुद्ध नसलेल्या रचना कालांतराने विचाराधीन करण्यात किंवा अप्रकाशित ठेवण्यात येतात, ह्याची नोंद घ्यावी. एखादी रचना तंत्रशुद्ध नसूनही

रमेशराव,

मतल्यातील अलामत पुढील शेरात पाळली पाहिजे....मतल्यात माफ्,साफ असे काफिये घेतल्यावर वाफ्,जिराफ असे काफिये यायला हवेत...... पुढील लेखनास शुभेच्छा...

डॉ.कैलास