व्हायचे ते

व्हायचे ते जगी चुकले कधी का?
तारकांना कुणी पुसले कधी का?

आज आले जरी अवसान हाती
पार नेण्या तुला पुरले कधी का?

हाय जीवास मी कवटाळलेले
काळ दारी उभा कळला कधी का?

फूल हाताळले असता कवीने
गंधही कोवळा उरतो कधी का?

मी जशी लावली निरपेक्ष माया
तू तशी ना दिली मजला कधी. का ?

रात्र काळी कधी टळे ना कपाळी
एवढी ती विचारी होती कधी का ?

वावगे वाटले असले जरी 'ते'
थांबले ना कुणी करण्या कधी. का?

धूमकेतू झणी स्फुरता , करंटे
आडवाया तया धजले कधी का

प्रतिसाद

हाय जीवास मी कवटाळलेले
काळ दारी उभा कळला कधी का?

फूल हाताळले असता कवीने
गंधही कोवळा उरतो कधी का?

मी जशी लावली निरपेक्ष माया
तू तशी ना दिली मजला कधी. का ?

रात्र काळी कधी टळे ना कपाळी
एवढी ती विचारी होती कधी का ?

वावगे वाटले असले जरी 'ते'
थांबले ना कुणी करण्या कधी. का?

वरील द्विपदींतली यमके तपासावीत. अलामत भंग झाली आहे. तंत्रशुद्ध नसणारी रचना कालान्तराने अप्रकाशित/विचाराधीन करण्यात येते.

आदित्य साहेब.......आशय हरेक शेरतिल उत्तम आहे......

जरा विश्वस्त काय म्हणतात याकडे लक्ष द्या.....

डॉ.कैलास

खरंच.. आशय सुंदरच आहे, विशेषतः पहिल्या काही शेरातील.

आशय छान. तंत्राकडे पहा.
गझल ही एकतर गझल असते किंवा नसते. 'गझलगाणे' वगैरे काही नसते. काही लोकांना १५-१५ वर्षे लिहूनही तंत्रशुद्ध गझल लिहिता येत नाही असे मी पाहिले आहे. ते लोक 'गझलगाणे' वगैरे थातुर-मातुर नाव देऊन अशी गझल आणि पर्यायाने स्वतःला कीर्तिमान करू पाहत आहेत. तंत्र गझलेत महत्वाचेच आहे.

सर्व मंडळींना धन्यवाद!
नक्कीच सुधारणा करण्यात येइल

फूल हाताळले असता कवीने
गंधही कोवळा उरतो कधी का?
सर्वात आवडला...
पण ... ही गझल नाहीये... :(