सांभाळ

तू जरा पाने मनाशी चाळ माझी
अक्षरे हृदयातली रक्ताळ माझी

तूच तू माझ्यात अन् बाहेर माझ्या
ऊन्ह तू तू सावली पानाळ माझी

मी तुझ्या केसातला गजरा सुगंधी
तू मिठी वार्‍या तली केसाळ माझी

ती अशी मजला कशी विसरून गेली
आठवे मजला प्रिया विसराळ माझी

तू अता विसरून जा माझ्याखुणाना
आसवे नयनातली सांभाळ माझी

प्रतिसाद

महेश,
tu jaraa paane manaashi chaal majhi
akshare hridyaatli,raktaal majhi
छान. रक्ताळमुळे जरा वेगळे वाटते आहे.

mi tujhya kesaatla, gajra sugandhi
tu mithi vaaryatli,kesaal majhi
छान. केसाळ पेक्षा गंधाळ वगैरे चालले असते का?
सांभाळ चा प्रयत्न छान.
पुढील वेळी मराठीचा प्रयत्न करा आणि ५ शेर करा.
शुभेच्छा!

मतला आणि शेवटचा शेर आवडला.
'केसाळ' चे काय ते बघा...
आणि ५ शेर केल्याशिवाय ही गझलमधे मोडणार नाही.. आणखी एखादा मस्त शेर करा!

वाहते ही धुंद दारूच्या प्रवाही
आज झाली चालही वेल्हाळ माझी!

देवनागरीतली गझल प्रकाशित करण्याऐवजी जुन्याच गझलेत बदल केले आहेत.

खुप छान. सावली आवडले.

तूच तू माझ्यात अन् बाहेर माझ्या
ऊन्ह तू तू सावली पानाळ माझी

शेर आवडला.

Ultimate !!!!!