जीवन
आठवण आज पुन्हा येते
मन तुझ्या अंगणात घेऊन जाते
काही केल्या तुझा चेहरा डोळ्यासमोरून सरत नाही
तुझी हासरी छवी बघून मन भरत नाही
यालाच का प्रेम म्हणतात
जवळ असताना हे कळत नाही
दूरगेल्यावर बरचं काही कळत
जवळ असताना मग वळत का नाही
प्रेम असच असत कसं
कस्तुरी हरणाला जवळ असताना जस कळत नाही
जेव्हा कळते तेव्हा ती त्याची नसते
ती दुस-याची मिळकत असते
कस्तुरी असो कुठेही सुगंधच देते
कारण तोच तिचा धर्म असतो
तिला माझा तुझा भेदभाव नसतो
जिवन हे असचं असाव
असावे ते चंदनापरी किंवा श्रावणसरी
याच जिवनाला अर्थ आहे
नातरी जगणे तुझे व्यर्थ आहे.................
Taxonomy upgrade extras: