टिळा (हझल)
ठोकला भिंतीत मी मोठा खिळा...
लावली माझी छबी, अन् वर टिळा!
राम या जागी पुन्हा येईल का?
माणसे झाली बघा येथे शिळा...
यंत्र पैसे देत जाऊ लागले!
मी म्हणालो 'उघड दरवाजा तिळा'...
भोपळा मी होत जातो नेहमी
आणि सुखही नेहमी होते विळा!
काम त्यांनाही कधी नसतेच का?
गात बसती सारख्या या कोकिळा
- कुमार जावडेकर, मुंबई
Taxonomy upgrade extras:
प्रतिसाद
चित्तरंजन भट
शनि, 05/05/2007 - 18:14
Permalink
विळा!
ठोकला भिंतीत मी मोठा खिळा...
लावली माझी छबी, अन् वर टिळा!
वा!
भोपळा मी होत जातो नेहमी
आणि सुखही नेहमी होते विळा!
मस्त! हझल आवडली. कोकीळ गाऊ शकतो ना? कोकिळा नाही बहुतेक. आपला कीसपाडूपणा.
विसुनाना
रवि, 06/05/2007 - 13:25
Permalink
वा! हा! हा!
वा! कुमारजी, मस्त हझल.
ठोकला भिंतीत मी मोठा खिळा...
लावली माझी छबी, अन् वर टिळा!
-कालच परत एकदा 'ब्लुफमास्टर' पाहिला.
त्यातला नानाच दिसतोय की! हा! हा!
आणि उन्हाळ्यात (विशेषतः मुंबईत आणि आजकाल कुठेही)माझा अनुभव-
वास घामाचा कसा जाईचना?
शर्ट उन्हाळी कितीदा हा पिळा ?
प्रणव सदाशिव काळे
रवि, 06/05/2007 - 17:43
Permalink
मी जसे देते तसे हे घ्या, गिळा
वा कुमार, छान हज़ल/ग़ज़ल.
ठोकला भिंतीत मी मोठा खिळा...
लावली माझी छबी, अन् वर टिळा!
सुरेख!
काम त्यांनाही कधी नसतेच का?
गात बसती सारख्या या कोकिळा
हो. वसंतात किलबिलाट फार झाला की असे वाटते एखाद्या वेळेस. कोकिळ गातो पण सामान्य माणसाच्या बोलण्यात कोकिळा येते त्यामुळे चालेल असे वाटते.
शिळा, विळा, तिळा हे गंभीर शेर म्हणूनही छान आहेत.
हज़लेला हे कसे वाटतात? -
बायको म्हणते "पुन्हा 'आई, ...' नको
मी जसे देते तसे हे घ्या, गिळा"
तांबडे माकड कुणी हिरवा गवा
पांढरा हत्ती कुणी कोल्हा निळा
कुमार जावडेकर
सोम, 07/05/2007 - 22:24
Permalink
मस्त
प्रणव,
दोन्ही हजलचे शेर आवडले...
तांबडे माकड कुणी हिरवा गवा
पांढरा हत्ती कुणी कोल्हा निळा ... वा! उ. प्र.च्या (किंवा कुठल्याही)राजकारणावर लिहिल्यासारखा वाटतो.
विसूनाना,
'पिळा'शीही सहमत!
- कुमार
सोनाली जोशी
बुध, 09/05/2007 - 18:41
Permalink
हा हा
वा वा! हझल आवडली.
केशवसुमार
गुरु, 10/05/2007 - 17:36
Permalink
वा..
कुमारपंत..
एकदम झकास हझल..टिळा, विळा,शिळा,तिळा,खिळा.. सगळेच शेर आबडले.
प्रवासींचा निळा हि उत्तम
अजून येऊदेत हझली..
नेहमी प्रमाणे अमचा दुसरा प्रतिसाद इथे वाचा
केशवसुमार