हे भाषांतर बरे आहे का?

माझ्या 'केवढे छान दिवस होते ते'या रचनेवर श्री. हेमंत पुणेकरांचे काही प्रतिसाद आल्यानंतर माझे व त्यांचे एक दोनदा दूरध्वनीवर संभाषण झाले. त्यात असे ठरले की त्यांनी त्यांची एक गुजराती गझल अर्थासहीत या संकेतस्थळावर लेखस्वरुपात प्रकाशीत करायची किंवा ती मला पाठवायची. त्याप्रमाणे तयंनी ती मला निरोपातून पाठवली. मी पहिल्यांदाच एक गुजराती गझल वाचली. मला त्यातील तीन ते चार शेर आवडले. हेमंतरावांनी मला त्याचे चक्क भाषांतर करायला सांगीतले. मी वृत्त तेच ठेवून अनुवादाचा प्रयत्न केलेला आहे. यात माझे स्वतःचे शब्दबाहुल्य वाढण्याच्या दृष्टीने एक पाऊल उचलू शकणे व गुजराती मूड मराठी रसिकांना देणे (ज्यांना माहीत नसेल त्यांना) असे दोन हेतू आहेत. कृपया प्रतिसादातून दोन्ही बाबींवर मूल्यमापनयुक्त मतप्रदर्शन व्हावे.

(हेमंतरावांची गुजराती लिपीतील शेर व त्या शेरांचा त्यांनी केलेला अनुवाद आणि त्यानंतर माझा मराठीतील शेर असा हा क्रम आहे.)

धन्यवाद!

પ્રથમ સૂર્ય પાસે ઉધારી કરે છે
પછી ચાંદ બહુ હોશિયારી કરે છે
प्रथम सूर्याकडून उधारी करतो, मग चंद्र खुप हुशारक्या मारतो.

रवीपासुनी तेज चोरून घेतो
बढाई करायास मग चंद्र येतो

જરી અમથી છે વાત મારી તમારી
છતાં સૌ વધારી વધારી કરે છે
अगदी थोडीशी आहे गोष्ट तुझी माझी, तरी सघळे वाढवून वाढवून करतात.

तुझ्या आणि माझ्यात घडते जरासे
उगाच्या उगा ऊत चर्चेस येतो

હવે મારા મિત્રો, રહ્યાં ક્યાં છે મારા?
મળે છે મને, વાત તારી કરે છે
अता माझे मित्र माझे कुठे राहिलेत? ते भेटतात मला आणी गोष्ट तुझी करतात.

अता मित्र माझे कुठे मित्र उरले?
मला भेटतो तो तुझे वृत्त देतो

આ ઝાકળને આવી, તુજ આંસુની ઈર્ષા
જે ફૂલોથી કોમળ સવારી કરે છે
ह्या दवबिन्दुला आली, तुझ्या अश्रुंची इर्षा, जे फुलांहून कोमल सवारी करतात.

दवाला तुझ्या आसवाचाच हेवा
फुलाहून कोमल अधिष्ठान घेतो

મહેકતી પળો છે, બહેક મન મૂકીને
બધું શું વિચારી વિચારી કરે છે
सुगंधी क्षण आहे, तु सर्व बंधनं सोडून "बहेक" (ह्या शब्दाचं मराठी जमलं नाही), सघळं काय विचार करुन करुन करतोस?

सुगंधी ऋतू, आज सैलाव थोडा?
सदा का विवेकास पाळून येतो(स)?

સુકોમળ સપન તે છતાં ઊગવાના
તું શું પથ્થરોની પથારી કરે છે!
सुकोमल स्वप्न तरी पण उगणारच, तु काय दगडांची पथारी करतोस?

हा शेर समजला नाही.

અચાનક મળી તું, અવાચક છું હું, પણ
હદય હર્ષની ચિચિયારી કરે છે
तु अचानक भेटलीस, मी निःशब्द झालो आहे (अवाचक आहे), पण, हदय तर हर्षावून किंकाळ्या मारतय.

अचानक तुला पाहुनी गोठलो मी
सुखाने जरी प्राण प्राणात येतो

गझलचर्चा: