जरी तो चेहरा आता दिसेना,
मनाचा कापतो पारा कितीदा !
कुपी
आनंदयात्री | नोव्हेंबर 25, 2009 - 10:46 pmवाट आहे पाहतो मी फक्त एका उत्तराची
भावनांना कैद आहे रोखलेल्या आसवांची
यापरी होती बरी उबदार सूर्याची दशा
सोसवेना धग अताशा कोवळ्या या चांदण्याची
एकही सौदा अता जमणार नाही सावल्यांशी
सवयही होतेच आहे मोकळ्या उघड्या उन्हाची
वाटते चिंता तुझ्या त्या रम्य एकाकी घराची
नेम धरुनी सज्ज आहे नजर तिरकी वारियाची
आठवांचा गंध आहे दरवळाया लागलेला
सांडली नकळत कुपी का अंतरीच्य़ा अत्तराची ?
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.

प्रतिसाद
आठवांचा गंध आहे दरवळाया
आठवांचा गंध आहे दरवळाया लागलेला
सांडली नकळत कुपी का अंतरीच्य़ा अत्तराची?
छान आहे हा शेर!
दुसरा शेर पुन्हा तपासावा. पहिल्या ओळीत गडबड वाटते आहे.
एकही सौदा अता जमणार नाही
एकही सौदा अता जमणार नाही सावल्यांशी
सवयही होतेच आहे मोकळ्या उघड्या उन्हाची
वा! चांगला शेर! फार आवडला.
आठवांचा गंध आहे दरवळाया लागलेला
सांडली नकळत कुपी का अंतरीच्य़ा अत्तराची ?
वा!
एकंदर गझल छान झाली आहे. यापरी होती बरी उबदार सूर्याची दशा ह्या ओळीत चुकून एक गुरू कमी राहिला असावा.
गझल आवडली. कुपी सुरेखच!
गझल आवडली. कुपी सुरेखच!
(रात्रीचा प्रतिसाद) खालील ओळी
(रात्रीचा प्रतिसाद)
खालील ओळी खूप आवडल्या.
वाट आहे पाहतो मी फक्त एका उत्तराची
एकही सौदा अता जमणार नाही सावल्यांशी
सवयही होतेच आहे मोकळ्या उघड्या उन्हाची
वाटते चिंता तुझ्या त्या रम्य एकाकी घराची
कुपी दरवळण्यावरून भटसाहेबांची एक द्विपदी आठवली.
येताच तू समोरी मी दरवळून जाते
माझ्यासमान तूही गंधाळतोस का रे?
मस्त रे ! आवडली
मस्त रे !
आवडली गझल...!
-दिलीप बिरुटे
खर खुप छान गझल
खर खुप छान गझल आहे...!!!
शुभेछा