चळ

उपकार आसवांचे ... हसतो अजूनही मी
आभार जीवनाचे.... जगतो अजूनही मी

मद्यालयात जातो, मी सांजवेळ होता
गहिर्‍या नशेतही तुज, स्मरतो अजूनही मी

मज चेहराच हसरा, आहे असा मिळाला
त्या चेहर्‍यात माझ्या, दडतो अजूनही मी

माझी-तुझी कहाणी सरली अजून कोठे ?
त्या आसवात तुझिया, झरतो अजूनही मी

दिन चालले असे अन वय वाढते असे हे
तू भेटता परंतू... चळतो अजूनही मी

 


 

प्रतिसाद

ही गझल अगदी खरीखुरी व्यथा व्यक्त करते.
सारेच शेर अप्रतीम आणि सहज.
वा! (आणि नंतर काही काळ स्वतःतच बुडून गेलो.)

फारच आवडली गझल

गझल साधी, सोपी, सहज, सुंदर!

वाहवा  माझ्यासारख्या मद्यप्याला आवडली. मतला बरा वाटत  नाही.

आवडलेले शेर :

मज चेहराच हसरा, आहे असा मिळाला
त्या चेहर्‍यात माझ्या, दडतो अजूनही मी

दिन चालले असे अन वय वाढते असे हे
तू भेटता परंतू... चळतो अजूनही मी

वैयक्तितदृष्टिकोनातून स्पष्टपणे सांगायचे कविता अजिबात आवडली नाही.

मद्यालयात जातो, मी सांजवेळ होता
गहिर्‍या नशेतही तुज, स्मरतो अजूनही मी ---छान!

दिन चालले असे अन वय वाढते असे हे
तू भेटता परंतू... चळतो अजूनही मी-----

शेर आवडले