'अ‍ॅबनॉर्मल पाखरू'

मध्यरात्री गाठते भलतेच बादल पाखरू
बिननियंत्रण फडफडे हे 'अ‍ॅबनॉर्मल' पाखरू

लावते कुंकू कुणाचे हे कुणी पाहू नये
पोचते भलत्याकडे घालून 'काजल' पाखरू

एक मंगळसूत्र जातो घालण्या त्याच्या गळ्या
बांधुनी घेते दुजाकडुनीच 'पायल' पाखरू

काय त्या गौरांगनांना लागले सोने असे?
आमच्या दुनियेत झाले 'हिट्ट' श्यामल पाखरू

'बेफिकिर' माझी उपेक्षा तूच बस समजून घे
लाभुदे माझ्या नशीबी एक 'नॉर्मल' पाखरू

गझल: 

प्रतिसाद

क्या बात है.....
जुनी पाने चाळताना ही रचना आढळली.....व्वा !!

प्रत्येक शेर मस्तच आहे.

शक्यतो गझलेतील प्रत्येक शेर स्वतंत्र असतो....पण या गझलेचे वैशिष्ट्य की यातिल हरेक शेर स्वतंत्र रित्या आणि एकत्रित्पणे सुद्धा छान भासतो.

डॉ.कैलास

अ‍ॅबनॉर्मल मधील "अ‍ॅब' हा उच्चार जरा तपासावा लागेल. बाकी ठीक.

'अ‍ॅब हा उच्चार तपासावा लागेल'

कशासाठी? मात्रा? लय? वृत्त?

तपासा, तपासा... मला इयर एन्डिंगचे प्रेशरही आहेच म्हणा!

माझ्यामते 'अ‍ॅब' याचा मूळ उच्चार 'अब' यासारखा होत असावा. तसा मी फारसा जाणकार नाही. मी जाणकारांनाच म्हटले होते की तपासावा म्हणून. तो उच्चार 'अ‍ॅऽबनॉर्मल' असा करावा लागतो आहे. मला शंका आहे कि नेमका उच्चार काय आहे ते. कारण आ,ई,ऊ,ए,ऐ,ओ,औ,अं,अ: असे उच्चार दीर्घ मानावेत हे माहित आहे. पण, अ‍ॅबनॉर्मल या मूळच्या आंग्लभाषेतील अ‍ॅ चा उच्चार नेमका काय धरला जातो मला माहित नाही.

** मला इयर एन्डिंगचे प्रेशरही आहेच म्हणा!
खरेतर अशा गोष्टींनी अनेकांचे इयर (कान) एंड व्हायला वेळ लागणर नाही...:)