आस्वाद

खांद्यावर पाय देउन तो आबाद होता,
मला गाडण्याचा हेतु तो निर्विवाद होता,

विरघळले रडु अश्रुंचा पाउस होता,
हसवण्याचा मेघांचा खोटा प्रमाद होता

थांबताना सारे पुढे मला का ढकलले,
सगळ्यांचा खुश असण्याचा उन्माद होता

एकदाच असावे निर्विघ्न ते चालणारे,
हात हाती देउन सोबतीचा नाद होता,

फूंकून चिंता धुरळ्यात दुःख उधळणारे,
घामाने शरीर माखण्याचा तिथे वाद होता

स्वर्गातुन ते नरकाचा हेवा करणारे,
मला मात्र स्वर्गात दोन्हींचा आस्वाद होता

निलेश

Taxonomy upgrade extras: 

प्रतिसाद

कल्पना चांगल्या आहेत. आपणांस रदीफ काफियाचीही बर्‍यापैकी कल्पना आलेली दिसते, ही चांगली गोष्ट आहे. पण रचना वृत्तात नाही. 
वृत्ताचा अभ्यास करण्याची गरज आहे. गझल लिहिताना घाई करू नये. लघू-गुरू समजून घ्यावे. ह्या बाबत काही दिवसांत माहिती देणारा लेख प्रकाशित करण्यात येईलच.  बाराखडी पुन्हा पुन्हा वाचावी.
ही गझल तंत्रशुद्ध झाली की गझल विभागात नेण्यात येईल.  तोपर्यंत गझलेवर अजून काम करावे.