अंगार

सोसायचे किती? अंत नाही..आकार नाही,
चालायचे किती? आयुष्यही फार नाही...

माझ्याच रेशमाचे फास माझ्या गळ्याशी,
सापळ्यांमधून कोणी वाचणार नाही...

उगाच रानटी किड्यांनो पालवी खाऊ नका,
अडवून हा वसंत थांबणार नाही...

थोपवू कशा विषारी जिव्हांच्या कट्यारी,
माझिया सत्यास कोणी आज आधार नाही...

उघडून कितेक भोळी आसवेडी लोचने,
स्वप्नेच वाटतो मी हा व्यापार नाही...

विझवू पहाती मजला कंदील रापलेले,
क्षणैक पेटतो जो मी अंगार नाही......
-----------------------------------------------------------नचिकेत भिंगार्डे

गझल: 

प्रतिसाद

कवितेचा अर्थ, उपमा, रूपके व एकंदरीत परिणाम उत्तम आहे........
पण छंद काही कळला नाही, कुठल्याच ओळीचा मीटर दुस-याशी जुळत नाहीये.

ऋत्विकशी सहमत.

उगाच रानटी किड्यांनो पालवी खाऊ नका - व्वा!

मला आपल्या गझलेचा आशय फार आवडतो.

सुंदर!

गझलेच्या सगळ्या द्विपदी एकाच वृत्तात असायला हव्यात.

तंत्रशुद्ध नसलेल्या रचना   विचाराधीन ह्या विभागात हलविण्यात येतील.