सगळ मान्य
सगळ मान्य, रणरणत उन आहे,
अन् पाय ही आता भरून आले आहेत
सुखाचा वारा ही रुसला आहे की काय कोण जाणे,
अन् एकटाच चालला आहेस तु, तुडवत ती गवताची राने
माणुस नाही, पशु नाही, पक्षी नाही...
कुणी नाही, दूर दूर कुणी नाही,
आभाळात छत्री वजा ही ढग नाही...
तरी चालत रहा रे ही वाट तुझ्या ध्येयाची,
निवडली आहेस जी तु स्व मनाची
वाटाड्या आहेस आता तूच तुझा,
डगमगु नकोस कधीच संकटाला
चालत रहा, चालत रहा..
जीवाच रान करत रहा..
मग येतील सोन्याचे दिवस ही पहा,
सोबतीला असेल सुखाचा वारा...!!
-- अतुल कुलकर्णी
गझल: