अंदाज : डॉ. श्रीकृष्ण राऊत

चिखलात खोल फसले सगळेच पाय आता;
मातीस सापडेना काही उपाय आता.

सौंदर्य आपले ती सांभाळते असे की,
नाहीच लेकराला पाजीत माय आता!

टपलेत भोवताली चारीकडून बोके;
सांगा कुण्या खुबीने वाचेल साय आता?

वात्सल्य कोणते हे आहे मला कळेना;
ही वासरास खाते दररोज गाय आता.

आक्रोश उंच जाता आकाश कंप पावे;
अंदाज येत नाही होईल काय आता.

********************************************
http://mazigazalmarathi.blogspot.com
********************************************

प्रतिसाद

करणारी गझल खासच!
आक्रोश उंच जाता आकाश कंप पावे;
अंदाज येत नाही होईल काय आता.
जबरदस्त!
क्रान्ति {रोज सकाळी असे काहि वाचावे सुंदर | अवघे जीवन भरून जावे आनंदाने!}

छानच......
सौंदर्य आपले ती सांभाळते असे की,
नाहीच लेकराला पाजीत माय आता!

टपलेत भोवताली चारीकडून बोके;
सांगा कुण्या खुबीने वाचेल साय आता?

वात्सल्य कोणते हे आहे मला कळेना;
ही वासरास खाते दररोज गाय आता.

आक्रोश उंच जाता आकाश कंप पावे;
अंदाज येत नाही होईल काय आता.

सौंदर्य आपले ती सांभाळते असे की,
नाहीच लेकराला पाजीत माय आता!..वा वा... विदारक वस्तुस्थिती सांगितलीय
-मानस६

आक्रोश उंच जाता आकाश कंप पावे;
अंदाज येत नाही होईल काय आता

वा.. साय, माय, गायदेखील अगदी दणदणीत दाद घेतील असेच शेर आहेत.