किती आळशी

किती  आळशी  तू  किती  आळशी
दही  भाकरी  रोज  का  वाढशी?


जरी  चूक  नाही  तरी  धुंडते
पकडतेच  मज  ती  जशी  सांडशी


जरी  दूध  द्यावे  तिला  साय ही
गिळे  मूषकाला  मनी-मावशी


वयाचा  म्हणे  ती  तुला  पोच  ना
स्वतः  नाचते  पण  जणू  षोडशी


सदा  दागिन्यांचा  धरे  हट्ट  ती
सणाला  म्हणे  खा  शिळी  लापशी

गझल: 

प्रतिसाद

जमले नाही.
तरी बरं.... सध्या कोणी 'डाळीच्या पिठापासून' वडे आणि भजी करायला शिकवीत नाहीत. आणि त्यातला फरक सांगत नाहीत. हे तुमचे भाग्यच म्हणायचे.
कलोअ चूभूद्याघ्या

अजयने अगदी मनातला मुद्दा मांडला.
 पुर्वी तसे सांगणारे होते, पण ते नसले तरी मी ते करण्याचा प्रयत्न करणारच!
सन्माननीय सुनेत्रा सुभाष!
माफ करा. आपली ही रचना 'गझल' नाही. स्पष्ट बोलण्याचा आपल्याला राग येईलच, पण मी फारशी काळजी करत नाही.
ज्यांना हे शेर आवडतील ते आवडले असे म्हणतीलच!

किती  आळशी  तू  किती  आळशी
दही  भाकरी  रोज  का  वाढशी? ( समजला नाही )

जरी  चूक  नाही  तरी  धुंडते
पकडतेच  मज  ती  जशी  सांडशी ( माझ्यामते साणशी असा शब्द असावा, असो, पण समजला नाही )

जरी  दूध  द्यावे  तिला  साय ही
गिळे  मूषकाला  मनी-मावशी ( हे ललित लेखन आहे )

वयाचा  म्हणे  ती  तुला  पोच  ना
स्वतः  नाचते  पण  जणू  षोडशी ( ही स्त्रियांमधे आपापसात होनारी टीका वाटते )

सदा  दागिन्यांचा  धरे  हट्ट  ती
सणाला  म्हणे  खा  शिळी  लापशी ( समजला नाही )
 


 

मा. अजय,
आपण स्पष्ट बोलल्यास बरे होइल. कारण चांगली गझलकार असले, तरी तिढ्यातले बोलणे समजून घ्यायचे कष्ट मी घेत नाही.
मा. भूषण,
स्पष्ट बोलल्याबद्द्ल आभार. आणि मी ही स्पष्ट बोलण्यास हरकत नाही असे मी तुमच्या बोलण्यावरून ग्राह्य धरते. बरेच शेर आपल्याला कळत नाहीत असे दिसते. यावरून एक सल्ला देऊ इच्छिते की आपण अधिकाधिक गझला वाचून आपली गझलांबद्दलची समज वाढवण्याचा प्रयत्न करावा. आपण काळजी करतच नाही हे मला माहित आहे, पण तरीही राग मानून घेऊ नये.
आणि ही रचना गझल वाटत नसल्यास, पुन्हा एकदा "वाचन वाढवा". गझला समजू लागतील.

दूसरी गोष्ट-तो शब्द "साणशी" नसून "सांडशी"च आहे. वाचन वाढवल्यास शब्दकोष आपोआपच वाढेल. "साणशी" या शब्दाचा अर्थ काय?
वयाचा  म्हणे  ती  तुला  पोच  ना
स्वतः  नाचते  पण  जणू  षोडशी
या शेरात, स्त्रियांमधे आपापसात होणारी टीका नाही, तर पुरूषांनी केलेल्या नाहक आरोपांची टिंगल आहे. समजले तर पहा...
 
आपली नम्र,
सुनेत्रा सुभाष.

सन्माननीय सुनेत्रा सुभाष,
'वाचन वाढवा' व 'गझलांबाबतची समज वाढवा'या आपल्या सल्ल्यांबद्दल आभारी आहे.
मी स्वतःला यापुढे आपल्या 'गझलां'मधून विथड्रॉ करत आहे.
आपण निर्धास्तपणे आपल्या 'गझला' प्रकाशित करत रहा, माझा प्रतिसाद निश्चीत येणार नाही.
आपल्याला दुखवायची खरच इच्छा नव्हती, तसे चुकून झाले असल्यास माफ करावेत.
आपल्याला मनापासून शुभेच्छा!

भूषण,
मी  दिलेल्या  सल्ल्यांचा  आपल्याला फारच  राग आलेला दिसतो.मी कधी  आपल्या  सल्ल्यांचा  राग  मानत नाही. तुम्हीही  असेच राग न  मानायला  शिका आणि  असेच  मनमोकळे  प्रतिसाद  देत  जा.मी ही  वडीलकीच्या  नात्याने काही सुचना केल्या  तर  काही  बिघडलेका?
असो,
आपली  नम्र
                        सुनेत्रा सुभाष

        

अजय, भूषण काकांशी सहमत..!!
जरा स्पष्टच,  ही रचना गझल नाहीच.


किती  आळशी  तू  किती  आळशी
दही  भाकरी  रोज  का  वाढशी? (मतला मलाही समजला नाही.)
जरी  चूक  नाही  तरी  धुंडते
पकडतेच  मज  ती  जशी  सांडशी  (छे, खुप प्रयत्न केला पण समजला नाही.)
जरी  दूध  द्यावे  तिला  साय ही
गिळे  मूषकाला  मनी-मावशी  (हा शेर न वाटता..लहान मुलांच्या बडबड गीतासारखे वाटते.)
वयाचा  म्हणे  ती  तुला  पोच  ना
स्वतः  नाचते  पण  जणू  षोडशी (तुमच्यामते हा शेर जर "पुरूषांनी केलेल्या नाहक आरोपांची टिंगल आहे." तर येथे पुरुषवाचक उल्लेख नाही. उदा: "ती", "नाचते" त्यामुळे हा शेर स्त्रीयांवर आधारीत आहे, असेच वाटते.)

सदा  दागिन्यांचा  धरे  हट्ट  ती
सणाला  म्हणे  खा  शिळी  लापशी (बहुधा हा शेर दागिन्यांचा हट्ट करणारी स्त्री पतीला सणाला शिळी  लापशी खा, असे म्हणत असावी. पण हे त्या व्यक्तिचे (विरोधात्मक)   व्यंगात्मक स्वभावचित्रण वाटते. शेर नाहीच..)
व्यक्तिगत दोष-आरोप करण्यापेक्षा विचारलेल्या शंकाचे निरसन व्हावे, कारण आपण सर्व गझलेचे उपासक आहोत.
स्त्री गझलकार म्हणुन आपला आदर करतेच, त्यामुळे शंकाचे निरसन व्हावे ही अपेक्षा.
लोभ असावा.

वयाचा पोच - शब्द खूप आहेत तुझ्याकडे. मस्त. वरती डाळीच्या पिठाचे वडे भजी काय? काय चाललंय काय? सुनेत्रा तू लक्ष देऊ नकोस.

स्वतः  नाचते  पण  जणू  षोडशी
हे पटण्यासारखे आहे.
उगीचच केल्यासारखी वाटली.

चांदणी,
याआधी मी मा.भूषण यांना दिलेला सल्ला खरेतर तुलाही लागू होतो आणि हा कुठल्या ही प्रकारचा व्यक्तिगत दोषारोप नाही. तुझ्या शंकांचे निरसन केलेही असते, पण तुझ्या शंका फारच बाळबोध वाटतात. तू खूप प्रयत्न करूनही समजले नसेल, तर अजून थोडे प्रयत्न कर. कारण अखंड गझलच न समजणार्‍यांच्या शंकांचे काय निरसन करणार? आता तु गझला लिहायला लागलीच आहेस तर लहान मुलांच्या बडबड गीतांमधून बाहेर ये आणि दृष्टिकोन व्यापक ठेव. याव्यतिरिक्त तुला सांगण्यासारखे माझ्यापाशी काही नाही.
स्त्री गझलकार म्हणून तुझाच नाही तर या वेबसाइट वरील सर्व आबालवृद्ध गझलकार व वाचकांचा मी आदरच करते, पण यापुढे निरसन करण्यायोग्य शंका असतील तरच मी या गोष्टीवर माझा वेळ खर्च करेन.
आपली नम्र,
सुनेत्रा सुभाष

मा. अर्चना,
फार फार आभार. या गझलेवर एका तरी गझलेची समज असणार्‍या व्यक्तिचा प्रतिसाद पाहून आनंद वाटला. धन्यवाद.
मा. गौतमी,
मी गझला इतर कुठ्ल्या ही कारणामुळे न करता, त्या मला सुचतात म्हणून "उगीचच" करते. म्हणून तुझे म्हणणे पटले.

सगळी गंमतच आहे.
काही दिवसापुर्वी अर्चना म्हणाली म्हणे गुंते म्हणजे काय... आता वयाचा पोच हा शब्दप्रयोग करू शकणार्‍याचा शब्दकोष मोठा आहे असे ती ठरवते.  तसेच आता तिला गझलेची समजही आल्याचे ठरवले गेले आहे.'लोका सांगे' म्हणीची आठवण झाली मला.
सुनेत्रा,
'तुला सुचते म्हणुन तू उगीच गझला करतेस' हे समजायला मला जरा वेळ लागला. माझी अशी समजूत होती की तुला उगीचच काहीतरी सुचते.
या संकेतस्थळावर प्रसन्न शेंबेकरांचा एक लेख आहे, तो वाचलास तर खूप सुधारणा करता येईल तुला.
चांदणी,
आगे बढो, हम तुम्हारे साथ है....

आदरणीय सुनेत्राआजी, (काकांना वडिलकीच्या नात्याने सल्ला म्हणजे मला आजीच्या नात्याने)
आपल्या सल्ल्यांबाबत धन्यवाद..!!
व्यापक वाचन माझे चालुच आहे, गझलेच्या समजाबाबत म्हणत असाल तर एक गझल चाहती म्हणुन तरी मला गझलांची चांगलीच समज आहे.
पण या प्रकारच्या रचना जर गझल (ते ही फक्त तुमच्याचमते) असतील तर हा प्रकार खरंच!! मला नवा आहे...या बाबतीत खरंच माझ्या शंका बाळबोध असुही शकतील..पुन्हा एकवार विनंती या रचनेचे स्पष्टीकरण द्यावे, माझ्यापरीने मी २ शेरांचा अर्थ समजुन घ्यायचा प्रयत्न केलेलाच आहे, हे आधीच्या प्रतिसादात वाचले असेलच तुम्ही..
अशा गझलांना वाह वाह करणार्‍यांनाच गझलेची समज असते असा गोड गैरसमज असेल तर तो आधी दूर करा, नाहीतर (लोकां सांगे..) आहेच.
शंका रास्तच होत्या, आपल्या आधीच्या काही गझलांची मी चाहती आहे. त्यामुळे या रचनेबाबत आपले मार्गदर्शन लाभावे.
(लहान मुलांच्या बडबड गीतांमधून बाहेर ये ???:)
हो, मला गझलेची, बडबडगीतांची पण आवड आहे त्यामुळे आपला हा सल्ला मी मुळीच मानणार नाही..(फरक इतकाच की बडबडगीते माझ्या वहीतच मर्यादीत ठेवते. अशा रचना वाचल्यावर तर मुळीच बाहेर पडू शकत नाही.)
माझाही एक सल्ला, जर कोणीही गझलेबाबत, शेरांबाबत स्पष्टीकरण मागितले तर आपण केलेल्या रचनेचा आशय, स्पष्टीकरण किंवा हेतू मांडण्याची तयारी ठेवा. (कारण त्यामागे गझल समजुन घेणे, गझलेचा आनंद घेणे हाच निर्मळ हेतू असतो) पण तरिही पटत नसेल तर मग राहू दे.
लोभ असावा.

या साइट वर मला मिळणार्‍या प्रत्येक प्रतिसादाचे व टीकेचे आजवर मी स्वागतच केले आहे. आणि सर्व शंकांचे निरसनही केले आहे. पण या हझलेबाबत जरा वेगळा अनुभव आला.
जरी  चूक  नाही  तरी  धुंडते
पकडतेच  मज  ती  जशी  सांडशी

हा शेर सारे काही सांगून जातो.  या हझलेवरील शंका या मला मुळीच रास्त वाटत नाहीत. म्हणून स्पष्टच सांगते- उगीचच आलेल्या शंकांना उत्तर मिळणार नाही. जर कुणाचा  हेतू निर्मळ असता तर उत्तरे फार पूर्वीच मिळाली असती.
"मनीमावशी" हा एक शब्द आल्यामुळे जर कुणाला ही गझल बडबडगीत वाटली असेल तर त्यांना सांगावेसे वाटते की गझलेत "आशय आणि आकृतीबंध" ह्या समजुन घेण्यासारख्या गोष्टी असतात.
ही रचना जर कुणाला 'गझल' (त्यांच्या व्याख्येतील) वाटत नसेल तरी ठीक.
आपली नम्र,
सुनेत्रा सुभाष

सन्माननीय सुनेत्राजी,
गझला 'उगीचच' करता तुम्ही, त्यात काही एक वावगे नाही. पण 'उगीचच' म्हणून लोकांच्या तोंडावर काय वाटेल ते फेकण्याची आणि वरून तुम्हाला आणि तुमच्या 'गझले'ला 'समजून' घेणारे प्रतिसाद येतील अशी अपेक्षा करणे टाळावे.
'वयाचा पोच' पाहून शाब्दीक कुवत ठरवणा-या अर्चनाजींना आपण 'समजूतदार रसिक' ही पदवी बहाल केलीत! मुच्युअल ऍड्मिरेशनचा प्रकार आहे हा.
असो. ह्या 'गझले'नंतर इथे सांडशी, भांडी डोक्यावर धपाधप पडल्याचा भास झाल्याने , येते काही दिवस आम्हाला 'गझल' 'समजणार' नाही असेच वाटू लागलेय.
आपला उध्वस्त,
गझलग्रस्त.


मा.अजय  ,भूषण,अर्चना,चांदणी,गझलग्रस्त सर्वांचे आभार मानते.