उजाड माळावरती हिरवळ शोधत गेलो



उजाड माळावरती हिरवळ शोधत गेलो
नको तिथे मग स्वभाववश मी गुंतत गेलो

प्रश्न तेवढा कठीण नव्हता, अता वाटते
उगाच तेंव्हा उभ्या जगाशी भांडत गेलो

प्रेम तुझ्यावर असे अम्ही बेसुमार केले
दिसेल त्यावर तुझ्या कल्पना लादत गेलो

तुझे बोट सुटले एका नाजुक वळणावर
उभा जन्म मी इथे-तिथे ठेचाळत गेलो

सरता सरता रात्र दुःख वाढ्वून गेली
दिवस तापला आणिक मी भेगाळत गेलो

-- अनंत ढवळे

प्रतिसाद

ठेचाळत

ठेचाळत हा शेर सुंदर आहे.

सुंदर

गझल नेहमीप्रमाणेच सुंदर. अनंत ढवळे यांची खूण पटवून देणारी आहे, यात शंका नाही. फक्त 'तुझे बोट..' या ओळीत लय हरवते असे वाटते. चूभूद्याघ्या....शुभेच्छा...
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

मलाही

हा शेर विशेष आवडला.

कबूल....

आपल्या बाबतीत ते कबूल केलं जावू शकतं ..कारण आपण ते समजून उमजून करता..आणि आपला अभ्यासही वादातीत आहे. मात्र आपला आदर्श / उदाहरण घेवून कुणी त्याची पुनरावृत्ती करू नये...शिवाय आपण मोठ्या मनाने कबूल करता हेही महत्वाचं आहेच...
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

सुरेख...

प्रश्न तेवढा कठीण नव्हता, अता वाटते
उगाच तेंव्हा उभ्या जगाशी भांडत गेलो
वा...वा...
तुझे बोट सुटले एका नाजुक वळणावर
उभा जन्म मी इथे-तिथे ठेचाळत गेलो
सुंदर...
सरता सरता रात्र दुःख वाढ्वून गेली
दिवस तापला आणिक मी भेगाळत गेलो
सुरेख...

क्या बात है....

प्रश्न तेवढा कठीण नव्हता, अता वाटते
उगाच तेंव्हा उभ्या जगाशी भांडत गेलो

प्रेम तुझ्यावर असे अम्ही बेसुमार केले
दिसेल त्यावर तुझ्या कल्पना लादत गेलो

तुझे बोट सुटले एका नाजुक वळणावर
उभा जन्म मी इथे-तिथे ठेचाळत गेलो

सरता सरता रात्र दुःख वाढ्वून गेली
दिवस तापला आणिक मी भेगाळत गेलो
              
क्या बात है......