कुठून साधेच लोक आले मला पुन्हा धीर द्यावयाला ?
अनोळखी आसवांत माझी मला पुन्हा आसवे मिळाली !
ठक!

सारे ठरून गेले हे नाटकाप्रमाणे !
मी नोकराप्रमाणे; तू मालकाप्रमाणे !
छोटा तुझ्यापुढे मी...पण यामुळेच मोठा...
दारी तुझ्या न आलो मी याचकाप्रमाणे !
नाही तुझी मिळाली पाठीस स्पर्शमाया...
फटकारलेस तूही मज चाबकाप्रमाणे !
ओथंबलीसही तू ! खोळंबलीसही तू !
केली न मी प्रतीक्षा पण चातकाप्रमाणे !
काळास कोणत्याही मी बांधला न गेलो...
मी चाललो कधी का कुठल्या शकाप्रमाणे ?
मी एवढा न साधा; मी एवढा न सोपा...
वाचू नये कुणीही मज पुस्तकाप्रमाणे !
फसलो जिथे तिथे अन् परिणाम हा असा की -
मी भेटतो मलाही आता ठकाप्रमाणे !!
-- प्रदीप कुलकर्णी
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.

प्रतिसाद
शक, पुस्तक अन ठक
हे तीन शेर फारच सुंदर आहेत.
वा!
ठक आणि शक - मस्तच शेर!!