बर्‍यापैकी
हासले बऱ्यापैकी, डोलले बऱ्यापैकी
त्याच त्या तालावरी मी नाचले बऱ्यापैकी

आखुनी होती दिली मज पूर्वजांनी धोरणे
ठेवुनी लक्षात ती मी वागले बऱ्यापैकी

बदलणाऱ्या वास्तवाची जाण होती ठेवली
मग नव्या साच्यामध्ये मज कातले बऱ्यापैकी

घडत होत्या सारख्या स्वत्त्व डिवचणाऱ्या चुकी
चुकत चुकतच सत्त्व माझे राखले बऱ्यापैकी

मोजले माझेच मी बेरंग या फसव्या जिण्याचे
पण स्वतःचा रंग घेउन रंगले बऱ्यापैकी

-- नीता भिसेप्रतिसाद

सन्माननीय नीता भिसे,
ही गझल अतिशय उत्तम आहे. खरच खूप वास्तव आहे त्याच्यात.
 

ही अजिबात बर्‍यापैकी गझल नाही तर चांगली गझल आहे. शुभेच्छा!
कातणे याचा सहसा घेतला जाणारा अर्थ वेगळा असतो व आपण वेगळा वापरला आहेत असे वाटते.

इश्श्य! एवढं सगळं करून गझल बरी केली?

हा स ले ब ऱ्या पै की, डो ल ले ब ऱ्या पै की
गालगा  लगागागा, गालगा  लगागागा
मात्रा=२४त्या च त्या ता ला व री मी ना च ले ब ऱ्या पै की
गालगा  गागालगा  गागालगा  लगागागा
मात्रा= २६


याप्रमाणे प्रत्येक शेर पहावा. काही  उला मिस-यात-
"गालगागा  गालगागा  गालगागा  गालगा" असे वृत्त आहे, पण त्याच  शेराच्या  सानी  मिस-यात नाही.

जाणकारांनी  कृपया  मार्गदर्शन  करावे.

पण नीता भिसेंसारख्या ज्येष्ठ गझलकार कवयित्रींनीच याबाबतीत स्वत: खुलासा करावा....
कारण मला तर आश्चर्यही वाटते...
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

आखुनी होती दिली मज पूर्वजांनी धोरणे
ठेवुनी लक्षात ती मी वागले बऱ्यापैकी
सुऱेख...

बदलणाऱ्या वास्तवाची जाण होती ठेवली
मग नव्या साच्यामध्ये मज कातले बऱ्यापैकी
वा...वा...