ह्या मनाचे, दुश्मनाचे काय करावे ?....

ह्या मनाचे, दुश्मनाचे काय करावे ?
ज़ख्म ओली ठेवते हे, काय करावे ?.....

आज त्याचे पंख त्याला काम न येई
पाखरु हे कैद झाले काय करावे ?.....

रोज का रे जीव माझा व्याकुळ होतो ?
बाण त्याचे मौज देई काय करावे.....

पारध्याचे नाव का बदनाम असे हे / ( असावे ) ?
ओढ घेई मृग त्याचे काय करावे ?.....

मी न माझा होउ शकलो, काय मजा ही !
मी तुझा होऊन गेलो, काय करावे ?.....

` ख़लिश ' - विठ्ठल घारपुरे / ५-४-२०१०
* शेर क्रमांक ४ मधे विश्वस्तानी योग्य पर्याय ठेवावा ही विनंती.

गझल: 

प्रतिसाद

खलिश जी.... काय करावे मुळे थोडे अडखळल्यासरखे होत आहे......''काय मी करु ?'' असे लिहिले तर?

बाकी गझल अन आशय आवडला.

डॉ.कैलास

कैलासजी , धन्यवाद .अवश्य, मी मिटर बद्लून बघेन.
लोभ असावा.
` ख़लिश ' / ६-४-२०१०.

या मीटरच्या ऐवजी 'भेटलेली माणसे घनदाट होती' चा मीटर वापरला तर अधिक सहज वाटेल.

- कलोअ चुभुद्याघ्या

पारध्याचे नाव का बदनाम व्हावे? - असं केलं तर?

वाचताना थोडं अडखळायला होतंय,
मी न माझा होउ शकलो, काय मजा ही !
मी तुझा होऊन गेलो, काय करावे ?.....
हा आवडला..

ओढ घेई "मृग" त्याचे
मृग = दोनही लघुच आहेत. मृऽऽग असे वाचावे लागत आहे. तसेच, "मॄग" असे दीर्घ लिखाण चुकीचे होईल.

अजयजी, नमस्कार.धन्यवाद.-* एक शंका.-जर मृगांचे / मृगाचे असे असते तर ? येथे मृ लघु धरला असता की गुरु? येथे मृ जास्त हरकत मधे येतो आहे. ( जसे दर्द मधे द हरकत मधे आल्या मुळे दर गुरु धर ला जातो/ दृष्टी मधे दृ ईत्यादी ). शंकेचे निराकरण होईल हाच हेतु आहे.
` ख़लिश ' / ९-४-२०१०.

फाटक ह्यांचे निरीक्षण चांगले आहे. वृत्ताची निवड फार महत्त्वाची ठरू शकते.
उदा. ह्या मनाचे, दुश्मनाचे काय करावे ? ह्या ओळीत दुश्मनाचे नंतर अडखळलो.
बाकी छान.

खलिश,
.-* एक शंका.-जर मृगांचे / मृगाचे असे असते तर ? येथे मृ लघु धरला असता की गुरु? येथे मृ जास्त हरकत मधे येतो आहे. ( जसे दर्द मधे द हरकत मधे आल्या मुळे दर गुरु धर ला जातो/ दृष्टी मधे दृ ईत्यादी ).

प्रथम आपल्या उदाहरणांबद्दल :
दर्द आणि दृष्टी या दोनही उदाहरणात पुढील जोडाक्षरातील अर्ध्या अक्षराचा आघात मागील "द" अक्षरावर येत असल्याने "द" अक्षर गुरू मानले जाते. "दृष्टी" मध्ये "दृ" दीर्घ मानला जातो कारण पुढील अर्ध्या "ष" चा आघात त्यावर येतो म्हणून. तो "दृ" आहे म्हणून नव्हे.
मात्र तसे मृग मध्ये नाही. रुकार दोन प्रकारचे आहेत. एक लघु आणि एक गुरू. जसे, "मृ" आणि "मॄ". लघु रुकाराचा उच्चार लघुच केला जातो. त्यामुळे मृगांचे किंवा मृगाचे असे काहीही केले तरी "मृ" दीर्घ धरला जाणार नाही. मात्र, "मृच्छकटिक" मध्ये अर्ध्या "च" चा आघात "मृ" वर येत असल्याने तेथे तो दीर्घ मानला जातो. अशा पद्धतीचा आघात "मृग" या शब्दांत नाही. म्हणून "मृ" लघुच मानला पाहिजे. ऋषी, कृषी, गृहित येथील रुकार माझ्यामते लघुच आहेत. तसेच, अमृताचे या शब्दाचे वृत्त 'गा ल गा गा' असे होईल.
धन्यवाद.

सरळ 'ओढ घेई मृग तयाचे काय करावे' करा ना.... प्रश्नच मिटला.
दोन लघु एका दीर्घाऐवजी बसतात.

श्री अजयजी व ऋत्विकजी ,शंकेचे निराकरण केल्या बद्दल आणी पर्याय सूचवल्या बद्दल मनः पूर्वक आभार.
` ख़लिश '/९-४-२०१०.

छान गझल.