होकार

लोक म्हणाले नियतीचा तो डावच खासा होता
माझे दान उधळले, तुझिया हाती फासा होता

काल तुझ्यालेखी माझ्य़ा त्या ओळी अमूल्य होत्या
आज तुझ्यालेखी माझा तो फ़क्त खुलासा होता

घालताच तू फुंकर माझ्या जखमा भरून आल्या
घावहि तुझेच होते त्यावर तुझा दिलासा होता

तुझ्या स्वागता मी स्वप्नांनी गाव सजवला होता
घरकुल बनले नाही कारण पोकळ वासा होता

ओघळणाऱ्या फुलांत लपली अधुरी एक कहाणी
मातीमधुनी उगवुन आला एक उसासा होता

नकार पचवत गेलो त्याचे कौतुक असह्य झाले
अरे जीवना एखादा होकार हवासा होता
- नचिकेत जोशी
(इतरत्र प्रकाशित)

गझल: 

प्रतिसाद

काल तुझ्यालेखी माझ्य़ा त्या ओळी अमूल्य होत्या
आज तुझ्यालेखी माझा तो फ़क्त खुलासा होता
खासच!
सुंदर गझल!

ओघळणाऱ्या फुलांत लपली अधुरी एक कहाणी
मातीमधुनी उगवुन आला एक उसासा होता

नकार पचवत गेलो त्याचे कौतुक असह्य झाले
अरे जीवना एखादा होकार हवासा होता

चांगले शेर आनंदयात्री! गझलही चांगली आहे.

धन्यवाद!

काल तुझ्यालेखी माझ्य़ा त्या ओळी अमूल्य होत्या
आज तुझ्यालेखी माझा तो फ़क्त खुलासा होता

सुंदर...

>>घावहि तुझेच होते
वाचताना , म्हणताना अडखळायला झाले.

शुभेच्छा

आवडली.

अजयराव, बेफिकीर, वैभवदादा...
thanks.... :-)

खुप छान आहे. अधुरी एक कहाणी आवडले.

नकार पचवत गेलो त्याचे कौतुक असह्य झाले
अरे जीवना एखादा होकार हवासा होता.....सही !!

काल तुझ्यालेखी माझ्य़ा त्या ओळी अमूल्य होत्या
आज तुझ्यालेखी माझा तो फ़क्त खुलासा होता.................... जबरी !!

वा.....उत्तम गझल !

नकार पचवत गेलो त्याचे कौतुक असह्य झाले
अरे जीवना एखादा होकार हवासा होता....

काल तुझ्यालेखी माझ्य़ा त्या ओळी अमूल्य होत्या
आज तुझ्यालेखी माझा तो फ़क्त खुलासा होता

वरील दोन्ही शेर चांगले आहेत. एकंदर छान.

प्रताप, जयश्रीजी, श्रीवत्स, चित्तजी...
मनापासून धन्यवाद.. :)