गझलभक्ती

देहावरी मी ठेवली माळ तुळशीची
ती कालची मी सोडली चाल जिवनाची

मी गोंदला टीळा कपाळास नटलेला
भक्तीच आता जाहली ढाल जिवनाची

मी घेतली वीणा अता खांद्यावरी या
झंकारली देहातली टाळ जिवनाची

मी नाचतो घेतो पताका डोइवर या
त्या पायरीशी जोडली नाळ जिवनाची

ही लागली ती ओढ पांडुरंग पायी
मग चंदनासम गंधली साल जिवनाची

....गझलतंत्रात असा भक्तीरस असतो व बसतो का?

गझल: 

प्रतिसाद

ही गझल आहे का?

कैलास

अनिल,
मतला सोडून सर्व ठिकाणी 'जिवनाची' घेतल्याने मतल्याच्या काफियाला महत्व उरत नाही. मुळात मतल्यात काफिया चुकला आहे हे तुम्हालाही माहीत असेल.
भक्ति हा विषय गझलेत येऊ शकतो का?
यावर माझे मत होकारार्थी आहे. मात्र त्याचे भावगीत किंवा भक्तिगीत होवू नये अशी जबाबदारी गझलकाराची. भक्तिसुद्धा अतिशय वेगळेपणाने मांडता येते.
संत तुकाराम महाराजांनी असे म्हटले आहे,
वेदांचा तो अर्थ अम्हासीच ठावा, येरांनी वहावा भार माथा
यात कुठेही देवाची स्तुती नाही. मनातील तीव्र भावना मांडली आहे.
केवळ स्तुती, वर्णन न आणता भक्तिपर विचार मांडता आला तर गझलेत तो घेण्यास हरकत नसावी. तसेच जीवनविषयक कोणतेही भाष्य गझलेत येऊ शकते असे मला वाटते.
माझ्या विचारांना पुन्हा उजाळा दिल्याबद्दल धन्यवाद.

धन्यवाद अजयजी
वारकरी संप्रदायाची तत्वे मांडण्याचा प्रयत्न होता.
काफिया चूकल्याबद्द्ल क्षमस्व.

भक्तिपर विचार मांडता आला तर गझलेत तो घेण्यास हरकत नसावी.
आपले मनःपूर्वक आभार.

तरीही मनात कुठेतरी वाटते की, निसर्गवर्णन व भक्ती गझलेत मांडताना मनातले विचार तंत्रात बांधणे जरा अवघडच जाते (निदान मला तरी)

गझलेवर प्रेम असल्यानेच मी हे प्रयत्न करत आहे.
लोभ असावा.

गझलेवर प्रेम असल्यानेच मी हे प्रयत्न करत आहे. -

- माझ्या शुभेच्छा!