मी मोजत असते रात्री

मी मोजत असते रात्री ,ते चमचमणारे तारे

मी मोजत असते रात्री ,ते चमचमणारे तारे
गुणगुणून जाते तेव्हा गीतास तुझ्या हे वारे

का तुला पसारा दिसतो अन् ही उरलेली कामे
जाणून कशा घे गेल्या त्या रात्री तुझ्या विचारे

पडदाही सरकवला मी अन् घट्ट लावली खिडकी
आवाज कशाचा आला? आतून कोण झंकारे?

वळवून मान ती बघते, ओढणी सारखी करते
इतके करून म्हणते मी केले ना कधी इशारे

या वादळात हो तूही एकदा हवाली माझ्या
असलो मी उधाणलेला तरीही जपतो किनारे

केव्हा सांगू, काय लिहू , येईल पसंतीस तुझ्या?
बघ गेले हरवुन यातच कसे शब्द माझे सारे

-सोनाली जोशी

गझल: 

प्रतिसाद

हे शेर खूप आवडले.

का तुला पसारा दिसतो अन् ही उरलेली कामे
जाणून कशा घे गेल्या त्या रात्री तुझ्या विचारे

पडदाही सरकवला मी अन् घट्ट लावली खिडकी
आवाज कशाचा आला? आतून कोण झंकारे?

वळवून मान ती बघते, ओढणी सारखी करते
इतके करून म्हणते मी केले ना कधी इशारे

या वादळात हो तूही एकदा हवाली माझ्या
असलो मी उधाणलेला तरीही जपतो किनारे

या वादळात हो तूही एकदा हवाली माझ्या
असलो मी उधाणलेला तरीही जपतो किनारे

ही द्विपदी आवडली पण खालच्या ओळीतील छंद समजला नाही.

का तुला पसारा दिसतो अन् ही उरलेली कामे
जाणून कशा घे गेल्या त्या रात्री तुझ्या विचारे

पडदाही सरकवला मी अन् घट्ट लावली खिडकी
आवाज कशाचा आला? आतून कोण झंकारे?

वळवून मान ती बघते, ओढणी सारखी करते
इतके करून म्हणते मी केले ना कधी इशारे

या वादळात हो तूही एकदा हवाली माझ्या
असलो मी उधाणलेला तरीही जपतो किनारे

वा! वरील सर्व शेर फार आवडले. गझल चांगली झाली आहे. काही ठिकाणी (शेवटच्या तीन ओळी) लय वेगळी झाली आहे.

पडदाही सरकवला मी अन् घट्ट लावली खिडकी
आवाज कशाचा आला? आतून कोण झंकारे?
आतून कोण झंकारे? - छान.
वळवून मान ती बघते, ओढणी सारखी करते
इतके करून म्हणते मी केले ना कधी इशारे
हेही आवडले.

सोनाली,
तुझी गझल फार छान आहे.
पडद्याचा शीर छान आहे.