मनाला पटेना
मनाला पटेना तरी ऐकणे
तुझे तेच ते तेच ते बोलणे
मलाही नवे ना तुलाही नवे
ठरावीक होते तुझे वागणे
तुझा नेम कुठला असे नेमका
दुडी चालणे की मला टाळणे ?
कुणाला मिळे नाव यादीतले
कुणाचे असे राहिले टाचणे
तसे आज काही न मिळवायचे
तरीही पटेना मला थांबणे
जसा वाहतो पाट शेतातुनी
अजयचे तसे हातचे राखणे
- अजय अनंत जोशी
गझल:
प्रतिसाद
बेफिकीर
रवि, 17/01/2010 - 11:26
Permalink
तसे आज काही न मिळवायचे तरीही
तसे आज काही न मिळवायचे
तरीही पटेना मला थांबणे
सुंदर शेर!
अनिल रत्नाकर
रवि, 17/01/2010 - 12:54
Permalink
जसा वाहतो पाट शेतातुनी अजयचे
जसा वाहतो पाट शेतातुनी
अजयचे तसे हातचे राखणे
पाटाच पाणी गुलाब, जाई-जुई, मोगरा फुलवित जाते. आपली गझलही ओघवती आहे. हे जर हातचे राखणे असेल तर, अजुन प्रचंड साठा असणार हे निश्चित.
अनंत ढवळे
रवि, 17/01/2010 - 20:52
Permalink
मलाही नवे ना तुलाही
मलाही नवे ना तुलाही नवे
ठरावीक होते तुझे वागणे
तसे आज काही न मिळवायचे
तरीही पटेना मला थांबणे
सहल्-सुंदर शेर !
अर्चना लाळे
मंगळ, 19/01/2010 - 11:13
Permalink
तेच ते दोन्दा का घेतलय? दुडी
तेच ते दोन्दा का घेतलय?
दुडी म्हणजे काय?
टाचणे च्या ऐवजीए टोचणे हवे होते का?
अजय अनंत जोशी
बुध, 20/01/2010 - 17:38
Permalink
प्रतिसाद दिलेल्या-न दिलेल्या
प्रतिसाद दिलेल्या-न दिलेल्या सर्वांना धन्यवाद.
अनिलजी,
आपल्या माझ्याबद्दलच्या अपेक्षेबद्दल आपल्यालाच शेभेच्छा! :)
अनंतजी,
करंगळीच्या करामतीने 'सहज' चे 'सहल' केले. पण मला तेही वाचून सहल काढावी की काय असे वाटले. :)
बाकी, प्रश्नार्थक मुद्रांना...
पुन्हा कधीतरी...
बेफिकीर
गुरु, 21/01/2010 - 15:25
Permalink
मक्ता लक्षात आला नाही. पाट
मक्ता लक्षात आला नाही.
पाट शेतातुनी वाहताना हातचे काय राखतो? (प्रश्नार्थक मुद्रा आहे.)
सहल काढणार असलात तर 'बेफिकीर'लाही कळवा. तो कुठेही कधीही येतो. हा हा हा!
कैलास
सोम, 25/01/2010 - 21:39
Permalink
तुझा नेम कुठला असे नेमका दुडी
तुझा नेम कुठला असे नेमका
दुडी चालणे की मला टाळणे ?
दुडी चालणे = दुडक्या चालीने चालणे
माझ्या मते , अजय अनंत जोशी यांस हा अर्थ अपेक्षित आहे.
चू.भु.द्या.घ्या.
डॉ.कैलास गायकवाड
मिल्या
रवि, 31/01/2010 - 23:49
Permalink
तसे आज काही न मिळवायचे तरीही
तसे आज काही न मिळवायचे
तरीही पटेना मला थांबणे >>> व्वा सुंदर
अजय अनंत जोशी
सोम, 01/02/2010 - 17:54
Permalink
कैलासजी धन्यवाद! (माझे काम
कैलासजी धन्यवाद! (माझे काम केल्याबद्दल..)
मिल्याजी,
धन्यवाद!
अवांतर...
हम कभी 'मिल्या' नही | कभी मिलेंगे क्या?