नकार गर्भरेशमी
जिवंत राहिलो कसा रुतून दलदलीत मी?
उमेद एवढीच की फुलेल पद्म कर्दमी
कबूल कर अता तरी तुझ्या नसानसात मी
फितूर श्वास सांगती उभ्या जगास बातमी
कळेल का तुला सखे, मिळे न प्रेम सारखे
घडेल का असे कधी, फुले वसंत नेहमी?
कशास वेचिशी खुळ्या तिला वहायला कळ्या
तिच्याकडे खळ्या हजार, काय रे तिला कमी?
नवेच शौक पाळतो फुलास भृंग टाळतो
अशी अनेक अत्तरे म्हणे खरीदलीत मी
अजून खेळ हा तुझा सुरूच खेळवायचा
तुझा... तुझाच डाव हा! तुझीच लागते रमी
रडेनही... हसेनही... जगेनही अता पुन्हा
झुरायचे... मरायचे... विचार फक्त मौसमी
मनाविरुद्ध मी असा तुझ्यात गुंतलो पुन्हा
इलाज काय जर तुझा नकार गर्भरेशमी
अखेर मोडलास ना करार आपल्यातला
तशी कुणास तू कधी दिलीस जीवना हमी?
गझल:
प्रतिसाद
ऋत्विक फाटक
सोम, 23/11/2009 - 19:03
Permalink
कशास वेचिशी खुळ्या तिला
कशास वेचिशी खुळ्या तिला वहायला कळ्या
तिच्याकडे खळ्या हजार, काय रे तिला कमी?
सुंदर!
मनाविरुद्ध मी असा तुझ्यात गुंतलो पुन्हा
इलाज काय जर तुझा नकार गर्भरेशमी
हाही सुंदर!
नवेच शौक पाळतो फुलास भृंग टाळतो
अशी अनेक अत्तरे म्हणे खरीदलीत मी
वा: छान! ब-याच दिवसांनी एक 'नवीन' शेर वाचला!
बेफिकीर
सोम, 23/11/2009 - 19:20
Permalink
फितूर श्वास, खळ्या हजार व
फितूर श्वास, खळ्या हजार व नकार गर्भरेशमी हे शेर आवडले. भुंग्याचा नवीन शौकपण आवडला. ही कल्पना जरा आधीच्या कल्पनांच्या पुढची वाटली.
खळ्यांची व कळ्यांची तुलना करून खळ्यांना श्रेष्ठ ठरवले जाणे पण आवडले. कर्दमी हा शब्द माहीत नाही. कृपया अर्थ कळावा. रमी हा शेर समजला नाही.
गझल आवडली.
चित्तरंजन भट
मंगळ, 24/11/2009 - 11:54
Permalink
नवेच शौक पाळतो फुलास भृंग
वा! चांगला शेर. 'अशी अनेक अत्तरे म्हणे खरीदलीत मी' असे स्वतःच का म्हटले असावे? असे असले तरी खालची ओळ फार फार आवडली.
वा छान.मराठीत 'मौसमी'चे बहुधा 'मोसमी' होते. ही गझल गायनानुकूल आहे असे वाटते. एकंदर चांगली झाली आहे.
प्रसाद लिमये
मंगळ, 24/11/2009 - 13:21
Permalink
अत्तरे, खळ्या व गर्भरेशमी
अत्तरे, खळ्या व गर्भरेशमी नकार हे तीन शेर मस्त..... आवडले
ज्ञानेश.
मंगळ, 24/11/2009 - 17:57
Permalink
अप्रतिम! ही गजल प्रत्यक्ष
अप्रतिम!
ही गजल प्रत्यक्ष तुझ्या तोंडून ऐकली होतीच..! आता वाचून परत दाद देतो.
(खळ्यांचा शेर सर्वोत्तम. तेव्हा न ऐकवल्याबद्दल निषेध !)
केदार पाटणकर
बुध, 25/11/2009 - 13:40
Permalink
भूषण, कर्दम याचा अर्थ चिखल.
भूषण,
कर्दम याचा अर्थ चिखल.
बेफिकीर
बुध, 25/11/2009 - 13:56
Permalink
धन्यवाद केदार! मला हा शब्दच
धन्यवाद केदार!
मला हा शब्दच माहीत नव्हता.
मिल्या,
माझ्या रात्रीच्या अन दिवसाच्या प्रतिसादांमधे फरक पडतो. :-))
दिवसाचे प्रतिसाद खरे असतात. येथील प्रतिसाद दिवसा दिले आहेत. कृपया समजून घ्यावेत.
सोनाली जोशी
बुध, 25/11/2009 - 20:29
Permalink
गझल आवडली. अखेर मोडलास ना
गझल आवडली.
अखेर मोडलास ना करार आपल्यातला
तशी कुणास तू कधी दिलीस जीवना हमी?
वा मस्तच
क्रान्ति
शुक्र, 27/11/2009 - 20:50
Permalink
कशास वेचिशी खुळ्या तिला
कशास वेचिशी खुळ्या तिला वहायला कळ्या
तिच्याकडे खळ्या हजार, काय रे तिला कमी?
अतिशय सुरेख!
अखेर मोडलास ना करार आपल्यातला
तशी कुणास तू कधी दिलीस जीवना हमी?
कमालीचा शेर!
गझल आवडली.
काव्यरसिक
शनि, 28/11/2009 - 03:04
Permalink
कशास वेचिशी खुळ्या तिला
कशास वेचिशी खुळ्या तिला वहायला कळ्या
तिच्याकडे खळ्या हजार, काय रे तिला कमी?
सव्वाशेर ! अप्रतिम !
खूपच आवडली गझल.
मिल्या
मंगळ, 08/12/2009 - 23:46
Permalink
सर्वांनाच खूप खूप धन्यवाद
सर्वांनाच खूप खूप धन्यवाद
प्रताप
शुक्र, 05/03/2010 - 07:55
Permalink
खुप छान. आवडली.
खुप छान. आवडली.
ह बा
गुरु, 27/05/2010 - 19:28
Permalink
मिल्याजी खूप छान लिहीता
मिल्याजी खूप छान लिहीता तुम्ही.
झाडून सगळी गझल फाडू झालीये!!!