ग झ ल : ७ (अ) : दुरूस्त आणी पुनः संपादित : मला तो का वियोगाची व्यथा देतो ?

ग झ ल : ७ (अ)  : दुरूस्त  आणी  पुनः संपादित

 

मला  तो  का  वियोगाची  व्यथा  देतो ?
कधी  कुंती, कर्णाची  ही  व्यथा  देतो ....१.

 

कधी  काढून  घेतो  तो  कवच  माझे
कधी  सेवेत ही  तो  दुर्दशा  देतो....२.

 

फुलांची  मी   मनोभावे  पुजा  केली
मला  तो  रोज  काट्यांची  मजा  देतो....३.

 

कधी  स्वप्नात येऊनी  व्यथा  देतो
कधी  घावात  राहूनी  मजा  देतो....४.

 

उठवतो हात जेव्हां  मी  दुवे  साठी
मला  भिक्षेत  ही  तो  ही  सज़ा  देतो....५.

 

असा  आहे  ` ख़लिश ' तो  पीर  वेड्यांचा
शहाण्यांची   बघा  वेडा  मजा  घेतो....६.

 

` ख़लिश ' / विठ्ठल घारपुरे / १७-०७-२००९./२१.५८.


( मी  ह्या गझल च्या मतला आणी  दुसर्या शेर मधे सुधारणा केली आहे.कृपया ह्याची नोंध घ्यावी आणी मुआफी असावी )

गझल: 

प्रतिसाद

वृत्त पुन्हा एकदा तपासून बघावे. कर्णाची  ह्या शब्दांत ६ मात्रा आहेत. तुम्ही बहुधा ५ मात्रा गृहीत धरल्या असाव्या.  बऱ्याच ठिकाणी असे दोष आहेत. मतल्यात व्यथा देतो हे रदीफ प्रस्थापित झाले आहे. तांत्रिक दोष दूर करावे.

काही काही शेरांमधील मुद्दे चांगले आहेत. आपल्या आधीच्या गझलेच्या तुलनेत चुका कमी झाल्या आहेत. ( या विधानाबद्दल माफ करावेत, हा उपहास समजू नयेत.) लवकरच आपण एक शुद्ध गझल सादर कराल असे वाटते. ( याही गझलेत मराठीकरण मात्र कमी आहे असे वाटले. म्हणजे दुवेसाठी हात उचलणे, पीर हे साधारणपणे मराठीत आलेले नाही असे वाटते.)

बाकी, काय म्हणायचे यावर कुणी काही म्हणू शकत नाही, कसे म्हणायचे यावर मात्र काटेकोर होता येते. शुभेच्छा!


आपणाला बर्‍याच वेळा दुरुस्ती करावी लागते असे दिसते. आपण ''गझल परिचय'' प्रथम करून घ्यावा आणि मगच गझल द्यावी असे आपला आदर राखून माझे मत.
कलोअ
चूभूद्याघ्या

मान्यवर,
आभार,

एक खुलासा करु इच्छीतो :
१.मी मतल्यात " देतो "आणी तत्सम हम वज़न रदीफ़ , तसेच हम वज़न काफ़ियांचा उपयोग केला आहे.

२. एक शंका :
मोमिन साहेबांची एक कृती :
" असर उसको ज़रा नहीं होता...रंज़ राहत फ़ज़ा नहीं होता..."
तुम मिरे पास होते हो गोया... जब कोई दुसरा नहीं होता..."
ह्या रचने मधे अनुक्रमे :
ज़रा , फ़ज़ा, व फ़ा, बुरा,मज़ा,क्या , का, आज़मा, दुआ, मुद्दआ, ख़फ़ा, दुसरा , जुदा, सा, रसा, सिवा, ख़ुदा. अश्या काफ़ियांचा उपयोग केला आहे. मराठीत असे होउ शकते का ?

असो.
हज़रत दाग़ देहलवी ह्यांचा एक शेर आठवतो आहे तो नमूद करतो आहे....
" नहीं खेल एय `दाग़' यारों से कह दो
कि आती है उर्दू ज़ुबां आते आते..."
कुठ्ल्या ही भाषेच्या लेखनाच्या बाबतीत तसेच नाही का ?
आपला लोभ कायम असावा ही विनंती.

-` ख़लिश ' / २६-०७-२००९.