उद्दाम




मानले, होता खरा उद्दाम राजा माजला
यापरी, तेव्हा बरा संसार होता चालला!


राग याला - "शीतपेयांतून कीटकनाशके!"
घोट पाण्याचा मिळेना, पाय त्याचा सोलला


देश-परदेशातुनी कर्तृत्व त्याचे गाजते
चलन जेथे वाढले, संसार तेथे थाटला!


धूत गेले नेहमी मग डाग हा आला कसा?
विसळले बाई तुम्ही, नव्हता कधी हो घासला!


आमचे हे झिंगणे वाटेलही त्यांना जुने
काल त्यांनी ढोसली, मी थेंब आता चाखला


-- पुलस्ति.




गझल: 

प्रतिसाद

राग याला - "शीतपेयांतून कीटकनाशके!"
घोट पाण्याचा मिळेना, पाय त्याचा सोलला
वा! छान.

आमचे हे झिंगणे वाटेलही त्यांना जुने
काल त्यांनी ढोसली, मी थेंब आता चाखला
वरची ओळ नुसतीही आवडली. एकूण दोन्ही ओळी स्वतंत्रपणे चांगल्या आहेत. पण हा शेर कळताना थोडा त्रास होऊ शकतो. म्हणजे मला तरी पूर्ण कळला नाही. ओळींतला संबंध बरेच ठिकाणी स्पष्ट होत नाही. जसे डागाचा शेर मला कळला नाही. मतलाही स्पष्ट नाही. उद्दाम नंतर माजला आहे. त्यामुळे उद्दाम रिडंडंट, अनावश्यक वाटते. गझल लिहीत रहा. सफाई, स्पष्ट येईलच.
 

देश-परदेशातुनी कर्तृत्व त्याचे गाजते
चलन जेथे वाढले, संसार तेथे थाटला!
छानच!

राग याला - "शीतपेयांतून कीटकनाशके!"
घोट पाण्याचा मिळेना, पाय त्याचा सोलला


देश-परदेशातुनी कर्तृत्व त्याचे गाजते
चलन जेथे वाढले, संसार तेथे थाटला!
हे शेर विशेष आवडले...त्यातही  कीटकनाशकांचा .
छान !
 

प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.
पोस्ट करताना 'नीट जमली नाही ही गझल' असं वाटत होतंच. थोडं अजून काम करायला हवं होतं. प्रयत्न करीत राहीन!
-- पुलस्ति.

सु॑दर गझल!अप्रतिम.