प्रवास
झरा वाहिला आशेचा अन् माझा सारा मूड बदलला
गाडीमधून जातांना मी किती पाहिली फुले वेगळी..
त्यांची नावे कळण्याआधी मार्ग कधीचा मागे पडला..
दोन दिशांना करून वाटा, आला रस्ता समोर जेव्हा
मार्ग कोणता घ्यावा आता मी वळणांच्या वाटामधला
मी वेलाची फांदी धरली पण हादरली मुळे कशाने
असे कोणते वादळ झाले की ओळख तो जुनी विसरला?
प्रवास म्हणता ,समोर आला, मनात माझ्या असा दुरावा
लोकामधला, सत्तेमधला, जगण्यामधला तत्त्वामधला
असे कशाला..तसे का बरे.. लाटा आल्या ,उधाण आले
अन् उत्सुकता सरली तेव्हा वादळ शमले ,रोष निवळला
पानाफुलात किती शोधले, किती कळ्यांना मी विचारले
ज्याचे आहे तुला वेड तो प्रियतम काही नाही दिसला
-सोनाली जोशी
ही रचना इथेच प्रकाशित केली होती , लयीत थोडा बदल करून पुन्हा प्रकाशित केली आहे. आता थोडी बरी झाली असेल असे वाटते आहे..
गझल:
प्रतिसाद
ज्ञानेश.
गुरु, 02/04/2009 - 11:34
Permalink
बदल
नवे बदल चांगले वाटले.
एक दोन गोष्टी खटकताहेत-
मला म्हणाला घे मार्ग हवा जो दरी आणि त्या कड्यातला.. ही ओळ लयीत वाचता आली नाही.
"मला म्हणाला मार्ग निवड तू दरीतला किंवा कड्यातला.." असे काहीतरी केले तर?
मी वेलाची फांदी धरली पण हादरली मुळे कशाने
असे कोणते वादळ झाले की ओळख तो जुनी विसरला?
हा शेर चांगला आहे. पण यात "वेलाची फांदी" हा शब्दप्रयोग पचला नाही.
(माझ्या कुवतीप्रमाणे सांगीतले आहे. चूभूद्याघ्या.)
दशरथयादव
गुरु, 02/04/2009 - 14:55
Permalink
हा शेर
हा शेर आवडला
मी वेलाची फांदी धरली पण हादरली मुळे कशाने
असे कोणते वादळ झाले की ओळख तो जुनी विसरला?
सोनाली जोशी
गुरु, 02/04/2009 - 17:33
Permalink
तो वेल आणि ती वेल
तो आणि ती वेल असा दोन्ही प्रकारचा शब्दप्रयोग चालतो असे मला वाटते. वेलाला फांदी असतेच. (झाड आणि वेल दोन्हीपैकी वेल वापरण्यात माझा काही नक्की उद्देश आहे)
तुम्हाला नक्की काय खटकले ते सांगा, माझे काही चुकत असेल तर नक्की बदलेन.
प्रतिसादाकरता आभारी आहे
सोनाली
ज्ञानेश.
शुक्र, 03/04/2009 - 09:59
Permalink
आक्षेप नाहीच..
वेलाला (किंवा वेलीला) फांदी असतेच. पण ती इतकी बळकट असत नाही की (आधारासाठी वगैरे) धरता येईल.
अर्थात "मी वेलाची फांदी धरली" यातून मला जो बोध झाला तोही चुकीचा असू शकतो. त्यामुळे कुठल्याही शेरावर माझा आक्षेप वगैरे काही नाही. वाचल्यावर जे वाटले, तितकेच सांगीतले.
गैरसमज नसावा.
चित्तरंजन भट
सोम, 06/04/2009 - 12:48
Permalink
चांगली वेगळी गझल आहे
गाडीमधून जातांना मी किती पाहिली फुले वेगळी..
त्यांची नावे कळण्याआधी मार्ग कधीचा मागे पडला..
सुरेख!!
मी वेलाची फांदी धरली पण हादरली मुळे कशाने
असे कोणते वादळ झाले की ओळख तो जुनी विसरला?
फार फार छान. वेलाची फांदी योग्य आहे.
एकदम वेगळी गझल आहे. फार चांगल्या, ताज्या कल्पना वाटत आहेत. मराठीत अशा कल्पना आणखी यायला हव्यात.
पानाफुलात किती शोधले, किती कळ्यांना मी विचारले
ही ओळ बघावी. मात्रा ठीक आहेत. पण लयीत म्हणता येत नाही.
अजय अनंत जोशी
मंगळ, 07/04/2009 - 16:30
Permalink
असेच..
गाडीमधून जातांना मी किती पाहिली फुले वेगळी..
त्यांची नावे कळण्याआधी मार्ग कधीचा मागे पडला..
मी वेलाची फांदी धरली पण हादरली मुळे कशाने
असे कोणते वादळ झाले की ओळख तो जुनी विसरला?
पानाफुलात किती शोधले, किती कळ्यांना मी विचारले - मी वर जोर द्यावा लागतोय.
कलोअ चूभूद्याघ्या
चांदणी लाड.
शुक्र, 10/04/2009 - 18:07
Permalink
मनात माझ्या असा दुरावा
गाडीमधून जातांना मी किती पाहिली फुले वेगळी..
त्यांची नावे कळण्याआधी मार्ग कधीचा मागे पडला..
प्रवास म्हणता ,समोर आला, मनात माझ्या असा दुरावा
लोकामधला, सत्तेमधला, जगण्यामधला तत्त्वामधला
हे शेर आवडले.