गुलाबपाणी

शिंपडायला गुलाबपाणी येउन जा
आज आपल्या जुन्या ठिकाणी येउन जा

काय ज्यामुळे तुझी न होऊ शकले मी
सारवायला तुझी कहाणी, येउन जा

तू न यायचास जाणते, पण म्हणायची
खोड लागली जुनी पुराणी "येउन जा"

एक काळ गीत गायचा 'जायला नको'
आज आळवे करूण गाणी 'येउन जा'

काळजी मला, उगी तुला आठवेन मी
संपवायला जुनी निशाणी येऊन जा

वेड लागले कुणी म्हणे 'गौतमी'स या
बोलते हवेमधे दिवाणी येउन जा



















गझल: 

प्रतिसाद

गौतमी,
अलीकडच्या काळात आपली मला सर्वात जास्त आवडलेली गझल.

वा वा! बोलते हवेमधे दिवाणी! छान!

गौतमी, गझल खूपच छान आहे. आवडली.
सोनाली

गौतमी,
सुरेख  गझल . सगळेच  शेर  आवडले.
तरीही  हे दोन  जरा  जास्तच-
तू न यायचास जाणते, पण म्हणायची
खोड लागली जुनी पुराणी "येउन जा"


एक काळ गीत गायचा 'जायला नको'
आज आळवे करूण गाणी 'येउन जा...


एक शेर त्याच्या बाजूने-
वाट पाहण्यातली  जराशी  मजा  पहा..
एवढे  नको  म्हणूस  राणी - "येउन जा"

गौतमीजी, गझल आवडली,
काय ज्यामुळे तुझी न होऊ शकले मी
सारवायला तुझी कहाणी, येउन जा    (क्या बात है.)
खोड लागली जुनी पुराणी , संपवायला जुनी निशाणी , बोलते हवेमधे दिवाणी   हे शेर फारच आवडले.

व्वा..छान....
काय ज्यामुळे तुझी न होऊ शकले मी
सारवायला तुझी कहाणी, येउन जा

तू न यायचास जाणते, पण म्हणायची
खोड लागली जुनी पुराणी "येउन जा"

काळजी मला, उगी तुला आठवेन मी
संपवायला जुनी निशाणी येऊन जा

सुंदर

शिंपडायला गुलाबपाणी येउन जा
आज आपल्या जुन्या ठिकाणी येउन जा

काय ज्यामुळे तुझी न होऊ शकले मी
सारवायला तुझी कहाणी, येउन जा
आवडलेले शेर.