गझल-आजही



पेटली ह्रदयात होळी आजही
घेरुनी आली उदासी आजही


कोणत्या जन्मातला संबंध हा
बांधला जातो तुझ्याशी आजही


मी कितीसा वागलो तेंव्हा खरे
चाचणी घेतो मनाची आजही


जन्मलो  होतो इथे केंव्हातरी
चालली आहे भ्रमंती  आजही


आजही बघतात स्वप्ने तारका
रंगते हातात मेंदी आजही.....
                                                   (स्वर यमक)
अनंत ढवळे



गझल: 

प्रतिसाद

गझल आवडली, विशेष करून शेवटचा शेर.

मी कितीसा वागलो तेंव्हा खरे
चाचणी घेतो मनाची आजही
वा!

जन्मलो  होतो इथे केंव्हातरी
चालली आहे भ्रमंती  आजही
वा!

स्वरयमकांची गझल आवडली.