शब्दार्थ

ओठातुन माझ्या शब्द सांडतो आहे..
अन् अर्थ तयाचा माग काढतो आहे


हृदयावर विणुनी जाळे शब्दार्थांचे..
तक्रार नसावी - ' श्वास कोंडतो आहे '


बोजड शब्दां आकार लाभण्या काही..
बुद्धीची ऐरण रोज ठोकतो आहे


सोप्या शब्दांना समजुन घेण्या मीही
फेरीवाल्यांना रोज भेटतो आहे


सार्‍या शब्दांना खंत एवढी वाटे..
की, मी नसलेले अर्थ बोलतो आहे

गझल: 

प्रतिसाद

प्रिय मित्र अजय,
वृत्तही चांगले अन अर्थही चांगला. हाताळणीही चांगली.
तिलकधारीच्या शुभेच्छा!



सोप्या शब्दांना समजुन घेण्या मीही
फेरीवाल्यांना रोज भेटतो आहे


सार्‍या शब्दांना खंत एवढी वाटे..
की, मी नसलेले अर्थ बोलतो आहे

पहिल्या दोन आणि शेवटच्या दोन ओळी आवडल्या.

सार्‍या शब्दांना खंत एवढी वाटे..
की, मी नसलेले अर्थ बोलतो आहे


सोप्या शब्दांना समजुन घेण्या मीही
फेरीवाल्यांना रोज भेटतो आहे
या शेरावरून भटसाहेबांनी कुठेतरी म्हंतले आहे ते आठवले. खरी भाषा ऐकायला मिळते ती रस्त्यातल्या माणसाकडुनच!
चांगली रचना!

ओठातुन माझ्या शब्द सांडतो आहे..
अन् अर्थ तयाचा माग काढतो आहे
सार्‍या शब्दांना खंत एवढी वाटे..
की, मी नसलेले अर्थ बोलतो आहे
हे शेर फारच आवडले...

शब्दार्थाचे जाळे छान!

तिलकधारी, सुनेत्रा, श्रीनिवास, समीर, भूषण, चांदणी, गौतमी सर्वांना मनापासून धन्यवाद.
कलोअ चूभूद्याघ्या