ही भूमी
संतांची ही भूमी आहे
भक्तांची ही भूमी आहे
गेले फाशी देशासाठी
वीरांची ही भूमी आहे
हिंसेला जिंकू शांतीने
गांधींची ही भूमी आहे
नारी आहे देवी येथे
सीतेची ही भूमी आहे
गाणी गाती स्वातंत्र्याची
पंतांची ही भूमी आहे
नाही थारा गद्दारांना
सार्याची ही भूमी आहे
गझल:
प्रतिसाद
अजय अनंत जोशी
मंगळ, 27/01/2009 - 12:12
Permalink
गझलेची भूमी...
ही नुसती काव्याची नाही...
गझलांची ही भूमी आहे
गांधींची आणि सीतेची बसत नाही बरं....
अलामतीवर लक्ष द्या.
संतांची ही भूमी आहे
भक्तांची ही भूमी आहे
असे लिहिल्यावर ची ही भूमी आहे असा काफिया-रदीफ नक्की होतो. त्यामागे अलामत 'आं' अशीच घ्यावी लागेल. 'ई' किंवा 'ए' चालणार नाही (अपवाद म्हणूनसुद्धा).
यावर पूर्वी खूप चर्चा झाली आहे. (याच संकेतस्थळावर.) कुठेतरी असेलही.
कलोअ चूभूद्याघ्या
भूषण कटककर
मंगळ, 27/01/2009 - 12:21
Permalink
अलामत!
अजयचे म्हणणे मान्य आहे.
माझे वैयक्तिक मत - आशय जर 'सणसणीत' असेल तर तंत्र मारक ठरू नये.
माफ करा...पण आपल्या या वरील रचनेतील आशय हा गझलेसाठी मला योग्य वाटत नाही.
आपल्याला माझ्यासारखे स्पष्ट बोलणारे मित्र चालतील अशी आशा आहे. मला आवडतात असे मित्र!