पुढारी
आता मीही थोडा थोडा घडू लागलो
उगाच अपुले क्षणाक्षणाला हसू लागलो
सवाल कोणी उपेक्षितांचा विचारला तर...
'मीही आहे त्यातलाच' हे म्हणू लागलो
खेळ भावनांचा असतो हे कळल्यावरती..
मनात हसलो, जनात थोडे रडू लागलो
माकड म्हटले, 'कुणी मलाही टोपी देण्या -
थोडा आता खुर्चीवरती बसू लागलो'
नेता होता की होता कोणी अभिनेता
हात पसरता दान आंधळे करू लागलो
जे होते आधार कालचे, खचले म्हणुनी..
समोर येता पाठ फिरवुनी वळू लागलो
जरा तपासू म्हटले यांचे खिसे आतुनी
डगल्यांना या अवघड जागी दुखू लागलो
गझल:
प्रतिसाद
भूषण कटककर
शनि, 17/01/2009 - 11:47
Permalink
आवडली.
जे होते आधार कालचे, खचले म्हणुनी..
समोर येता पाठ फिरवुनी वळू नागलो
उच्च शेर! ( चुकुन नागलो झाले आहे, ते लागलो करावेत. )
जरा तपासू म्हटले यांचे खिसे आतुनी
डगल्यांना या अवघड जागी दुखू लागलो
फारच सुंदर!
गझल आवडली.
तिलकधारी
शनि, 17/01/2009 - 11:54
Permalink
मतला
मतला चांगलाय!
अजय अनंत जोशी
शनि, 17/01/2009 - 20:35
Permalink
धन्यवाद
चुकीची दुरुस्ती केली आहे.
भूषण,
तुम्हाला गझल आवडली हे वाचून चांगले वाटले. पण त्यापेक्षा, मी लिहिलेले समजण्याजोगे आहे याचा आनंद जास्त झाला.
कलोअ चूभूद्याघ्या
अनंत ढवळे
रवि, 18/01/2009 - 19:15
Permalink
अर्थ
सवाल कोणी उपेक्षितांचा विचारला तर...
'मीही आहे त्यातलाच' हे म्हणू लागलो
सुंदर शेर्..सामाजिक कविता ही प्रामुख्याने तिच्या अर्थाने सुंदर असते..हा शेर मात्र रूप आणि अर्थ या दोन्ही पातळ्यांवर खरा उतरतो..!
श्रीनिवास (not verified)
सोम, 19/01/2009 - 12:18
Permalink
खरोखरच
आवडली. नेता-अभिनेता सामान्य वाट्ते.
तिलकधारी
सोम, 19/01/2009 - 14:34
Permalink
रडू लागलो.
अजय,
गझल केलीसच!
एक दोन शेर वगळले तर ही गझल आहे.
त्यातही जनात रडू लागलो अतिशय सुंदर रचलास .
पुलस्ति
बुध, 21/01/2009 - 00:05
Permalink
छान!
पहिले ३ शेर फार आवडले!
अर्चना लाळे
गुरु, 22/01/2009 - 11:33
Permalink
माकड??
नेता अभिनेता वगैरे ठीक. माकड बिकड काय उगाचच?
तरी चांगल वाटतय.
चांदणी लाड.
शुक्र, 23/01/2009 - 00:40
Permalink
'मीही आहे त्यातलाच' ..
गझल आवडली...
सवाल कोणी उपेक्षितांचा विचारला तर...
'मीही आहे त्यातलाच' हे म्हणू लागलो.
हा शेर सर्वात जास्त आवडला....
अजय अनंत जोशी
शुक्र, 23/01/2009 - 19:16
Permalink
आभार
भूषण, तिलकधारी(काका), अनंत, श्रीनिवास, पुलस्ति, अर्चना, चांदणी सर्वांचे आभार.
मा. अर्चनाजी,
माकड हे प्रतिमास्वरूप वापरले आहे.
धन्यवाद.
कलोअ चूभूद्याघ्या
भूषण कटककर
शनि, 24/01/2009 - 11:34
Permalink
मला कळाले, वेळ जरा वाचवू लागलो.
अजय,
एकदा प्रतिसाद दिल्यावर खरे तर परत देण्याची आवश्यकता नसते. पण मी मुद्दाम दोन गोष्टींसाठी प्रतिसाद देत आहे.
आपल्या या गझलेतील मुद्दे नुसते समजण्यासारखेच आहेत असे नाहीत तर ते अतिशय सुंदर मुद्दे आहेत. अभिनंदन! आपल्या इतर रचनांच्या मानाने ही रचना, आपणच उपस्थित केलेल्या, 'गझल आणि गझलियत' या चर्चेच्या अनुषंगाने पाहिल्यास माझ्या मते गझलेच्या आशयाची आहे.
सन्माननीय अर्चना लाळे,
माझ्या मते 'माकड' ही प्रतिमा नाही. प्रतिमा या शब्दाचा अर्थ असा की 'जे सांगायचे आहे त्याचा उल्लेखही न करता वेगळेच काहीतरी सांगूनही तेच सांगीतल्याची भावना जागवू शकणे'! सदर शेरामध्ये 'नेत्यांना' 'माकड' म्हंटले आहे हे उघड समजत आहे. कारण त्यात 'टोपी', 'खुर्ची' असे शब्द आहेत. माझ्या 'अलामत सोड चिंता तू' या रचनेमध्ये एक शेर आहे.
इथे बेडूकवस्ती, ओंडक्याचा होतसे राजा
इथे नसतात असले प्रश्न, 'का', 'पण' सोड चिंता तू
यात माझ्यामते प्रतिमा आहे असे मानायला हरकत नसावी. बेडूकवस्ती म्हणजे काय, ओंडका कोण, त्याचा राजा झाला म्हणजे काय याचा विचार केला की कुठल्यातरी वेगळ्या गोष्टीबद्दल बोलायचे आहे असे वाटायला हरकत नसावी.
( मी माझ्याच शेराचे उदाहरण देऊन शहाणपणा करत आहे असे कृपया मानू नये, दुसर्याच्या शेराचे उदाहरण देण्याचे धारिष्ट्य झाले नाही व मला माझ्या शेरामागची भूमिका व्यवस्थित माहीत होती म्हणुन दिले. )
मात्र आपले एका गोष्टीसाठी मनःपुर्वक अभिनंदन!
आपणा लॉगिन न करताच प्रतिसाद देऊ शकता म्हणुन! योग्य वाटल्यास आम्हालाही सांगा ते कसे करायचे ते! म्हणजे जरा वेळ वाचेल!
अजय अनंत जोशी
शनि, 24/01/2009 - 12:10
Permalink
माकड याचा अर्थ...
आपले मत
माझ्या मते 'माकड' ही प्रतिमा नाही. प्रतिमा या शब्दाचा अर्थ असा की 'जे सांगायचे आहे त्याचा उल्लेखही न करता वेगळेच काहीतरी सांगूनही तेच सांगीतल्याची भावना जागवू शकणे'! सदर शेरामध्ये 'नेत्यांना' 'माकड' म्हंटले आहे हे उघड समजत आहे. कारण त्यात 'टोपी', 'खुर्ची' असे शब्द आहेत.
आपण असे दिले आहेत.
पण, माकड हे उघडपणे नेत्यांनाच म्हटले आहे हे आपले मत पूर्णतः चुकीचे आहे.
मी माकडाच्या स्वभावाचा विचार करून लिहिण्याचा प्रयत्न केला होता.
माकड आणि टोपीवाल्याची गोष्ट पहा. 'अनुकरण करण्याची वृत्ती' माकडात असते. खुर्चीवर बसले की टोपी मिळेल या आशेने ते खुर्चीवर बसू लागले. हा एक अर्थ.
माकड याचा दुसरा अर्थ 'अस्थिर प्रवृत्ती' असा होतो.
तिसरा अर्थ 'दुस-याच्या तालावर नाचणारा' असाही होतो.
आता, पुढारी याचा अर्थ समजून घ्या.
पुढाकार घेणारे, सन्माननीय बनू पाहणारे, पदासाठी प्रयत्न करणारे, पद असलेले इ. कोणीही.
केवळ राजकीय पुढारी असा अर्थ घेऊ नका. सामाजिक, धार्मिक, सांप्रदायिक,... अगदी कुटुंब प्रमुखही यात येईल. बाकी तुम्हाला आणखी काय सांगू...
कलोअ चूभूद्याघ्या
बोलू का
शनि, 24/01/2009 - 13:34
Permalink
वेगळा विषय
घेऊन केली आहेत. आनंद वाटण्याजोगे आहे. काही टोके थोडीशी बोथट आहेत.
वरील चर्चेत रस नाही.
(तसा मी फारसा बोलत नाही.)