तुला माहीत आहे ती
खुशाली दाखवे ती पण तुझ्या आगीत आहे ती
तिला माहीत नाही की तुला माहीत आहे ती
कसे वागा, जगा, बोला, जगाचे कायदे शिकलो
पुढे चोखाळली मी वाट जी 'शापीत आहे ती'
तिला झालाय पश्चात्ताप पुर्वीच्या धिटाईचा
दमाने आशिकी घे, या गतीला भीत आहे ती
"चुकी माझी न काही" सांगणे वेडेपणा आहे
'तुझ्या झाल्या चुका' म्हणणे जगाची रीत आहे ती
तसाही काळ होता, प्यायचो ठरवूनशी मदिरा
असाही काळ आला की अम्हाला पीत आहे ती
तुझा अन्याय साहे मी ,तुझा धिक्कार भगवंता !
'नराला लाभली ना बाब जी मादीत आहे ती'
न जाणे आवडीनिवडी तिला कळल्या कशा माझ्या?
तसे काहीच ना कारण तरी 'साडीत आहे ती'
तसा येणार नव्हतो मी, म्हणालो "जाउदे, झाले"
"जगावी जिंदगी ही वीत वा दिडवीत आहे ती"
विजेते आजला कोणी, पराजित आजला कोणी
पराजय आज वाटे जो, उद्याची जीत आहे ती
तयारी जायची मातीत माझी होत आली , बस,
सुकावी आसवांची ओल जी मातीत आहे ती !
प्रतिसाद
चित्तरंजन भट
मंगळ, 30/12/2008 - 01:42
Permalink
तिला माहीत नाही की तुला माहीत आहे ती
खुशाली दाखवे ती पण तुझ्या आगीत आहे ती
तिला माहीत नाही की तुला माहीत आहे तीवा! खालची ओळ फारच सुरेख आहे. पण वरच्या ओळीत सुधारणेला वाव आहे.
कसे वागा, जगा, बोला, जगाचे कायदे शिकलो
पुढे चोखाळली मी वाट जी 'शापीत आहे ती'वा.... वरच्या ओळीत सफाईदारपणा हवा असे वाटते.
माझ्यामते, एकंदर तुमच्या गझलांत सफाईदारपणा आल्यास त्या आणखी परिणामकरकहोतील. सफाईदार ओळी ह्या संस्मरणीय होण्याची शक्यता अधिक असते, असे मला वाटते.
शेवटी चूभूद्याघ्या.
भूषण कटककर
शुक्र, 02/01/2009 - 17:02
Permalink
धन्यवाद!
मनापासून धन्यवाद भटसाहेब,
बराच सराव व्हायला हवा आहे माझा. आपण प्रतिसाद दिल्याने जरा बळ आले. माझ्या नवीन रचनेत 'अलामत? सोड चिंता तू' मधे मी आपण सुचवलेल्या गोष्टीचा जरासा प्रयत्न केला आहे. एकदा आपले मत कळवावेत.
अजय अनंत जोशी
शुक्र, 02/01/2009 - 21:57
Permalink
१ आणि १०
फारच सुंदर.
कलोअ चूभूद्याघ्या
प्रसाद लिमये
गुरु, 08/01/2009 - 16:59
Permalink
तसा येणार
तसा येणार नव्हतो मी, म्हणालो "जाउदे, झाले"
"जगावी जिंदगी ही वीत वा दिडवीत आहे ती"
वा वा, सुरेख
हे "वीत दिड-वीत" छान जमलय
अनंत ढवळे
शनि, 10/01/2009 - 18:20
Permalink
सपाट
आणखी एक सपाट गझल.
भूषण कटककर
सोम, 12/01/2009 - 09:18
Permalink
धन्यवाद
धन्यवाद ढवळे साहेब,
माझी रचना आपल्याला आवडेल त्यादिवशी मला खरच खूप आनंद होईल. आपल्या स्पष्ट प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद! माझ्या रचनेमुळे आपल्याला गझलेचा आनंद मिळू शकला नाही याबद्दल क्षमस्व!
मी लवकरच एक गझल रचण्याचा प्रयत्न करत आहे, ती आपल्याला सपाट वाटू नये याचा प्रयत्न करीन.
सुनेत्रा सुभाष
गुरु, 15/01/2009 - 16:33
Permalink
मंगळ, 12/23/2008 -
मंगळ, 12/23/2008 - 19:47 — भूषण कटककर
खुशाली दाखवे ती पण तुझ्या आगीत आहे ती
तिला माहीत नाही की तुला माहीत आहे ती
कसे वागा, जगा, बोला, जगाचे कायदे शिकलो
पुढे चोखाळली मी वाट जी 'शापीत आहे ती'
तिला झालाय पश्चात्ताप पुर्वीच्या धिटाईचा
दमाने आशिकी घे, या गतीला भीत आहे तीशेर आवडले. आशिकी हा हिंदी शब्द इथे चालतोका?
"चुकी माझी न काही" सांगणे वेडेपणा आहे
'तुझ्या झाल्या चुका' म्हणणे जगाची रीत आहे ती
सुरेख शेर
तिलकधारी
शनि, 17/01/2009 - 11:45
Permalink
फक्त मक्ता.
मक्ता उतम आहे.