नकोच जाऊ तिथे अता तू

नकोच जाऊ तिथे अता तू विस्कटलेली पिसे बघाया
जखमेवरती मीठ चोळूनी  खोटेखोटे उगी रडाया


ना अश्रू ते, खारे पाणी तुझ्या स्वतःच्या रडगाण्याचे
मिठागरातुन ठेव भरोनी अळणी भोजन बरे कराया


प्रीती म्हणजे नव्हे मोगरा, गुलाब तो तर काट्यामधला
गाली नाही नेत्री फुलतो ह्रदय घेउनी येच पहाया


तुझी आसवे इतुकी निर्मल वाहुन नेती मी पण अवघे
शिंपल्यात ती पडतिल कारे होउन मोती मज उजळाया


पुरूष नव्हे मी, प्रकृती आहे स्वाभाविक ते मला आवडे
नार्सीसस चा वसा सोडूनी येशिल का तू इथे रहाया


क्षणात अंबर क्षणात धरती पिसे लागले तुला 'सुनेत्रा'
उतरुन तुझिया डोळ्यामध्ये कसे लागले पहा वहाया

गझल: 

प्रतिसाद

सन्माननीय सुनेत्रा सुभाष,
प्रकृती आहे  - इथे काहीतरी गडबड वाटते.
बाकी संदेश चांगले आहेत. अभिनंदन!

भूषण,
प्रकृति  हा  शब्द  चुकून  प्रकृती  असा  लिहिल्याने  गडबड  झाली  आहे.चूक  लवकर   लक्षात  आणून  दिलीत  म्हणून  धन्यवाद.