हमी


कुणालाच माझी हमी आज नाही.
जगाला कशी बातमी आज नाही ?

मला एकट्याला नको दोष देऊ.
तुझी प्रीतही संयमी आज नाही..!

कधी मी म्हणालो हवे चंद्र तारे,
कसा काजवाही तमी आज नाही..!

जरा धाव घे आसवांच्या सवे तू.
खरे दुःख हे, मोसमी आज नाही..!

तुझ्या वेदनेची नशा और काही.
तशी वेदनांची कमी आज नाही..!

--  अभिजीत दाते

गझल: 

प्रतिसाद

मला एकट्याला नको दोष देऊ.
तुझी प्रीतही संयमी आज नाही..!
छान

तुझ्या वेदनेची नशा और काही.
तशी वेदनांची कमी आज नाही..!

सुंदर! हा आविष्कार छानच आहे. नाहीतरी वेदनाच बोलकी असते. सुख माणसाला मुके करते. (पु. ल.) छान, मजा आली.

आणि वेदनेची नशा. व्वा!
कलोअ चूभूद्याघ्या