उलटे

उलटे तरून गेले
सुलटे हरून गेले

जपले गाव मी...पण
घरचे घरून गेले

मरणात गुंतलो अन
जगणे सरून गेले

श्रद्धांजली सग्यांची
शव गुदमरून गेले

जगणे उपेक्षितांचे
डोळे भरून गेले

कळले कसे जगावे
मरणे मरून गेले

थाळीत आंधळ्यांच्या
थोटे चरून गेले

हसणे तुझे मला ते...
जखमी करून गेले

अवघे पुरात चेले
नेते वरून गेले

पुतळा उभारला....पण
नाव विसरून गेले

ते दोन शब्द त्यांचे
दंगल करून गेले

गझल: 

प्रतिसाद

रस्त्याप्रमाणे हाही प्रयत्न शिकण्याच्या काळातला. म्हणून.

काही शेर चांगले आहेत.
माझ्यामते 'जपले गाव मी ...पण' यात काहीतरी चुकते आहे.
 

उलटे तरून गेले
सुलटे हरून गेले<?xml:namespace prefix = o ns = "urn:schemas-microsoft-com:office:office" /?>


वृत्त लहान असावे पण किती लहान असावे यावर एक समीक्षा पुढेमागे करायचा विचार आहे. मधे एकाने अशी पण गझल केली होती.


ही
ती
मी
की

भी


पाच शेर आहेत, वृत्त आहे, अलामत आहे, काफिया आहे, रदीफ आहे अन अर्थही आहे.


मतला बघा. ही...ती! म्हणजे 'कधी आवडे ही...कधी नावडे ती' सारखे काहीतरी


प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला होता तेव्हा!


मात्र या कवीचा हा शेर अन ही गझल लहान वृत्तात असली तरी हा शेर चांगला आहे. त्यात बराच आशय आला आहे. जे उलटे होते ते तरुन गेले, म्हणजे पोहताना काहीतरी बॅकस्ट्रोक का काहीतरी शिकवतात तसे लोक तरून गेले. पण जे सरळ चालत होते ते मरून गेले. शेवटी दोघेही गेलेच, पण आधीचे तरून अन बाकीचे मरुन!




जपले गाव मी...पण
घरचे घरून गेले


घरचे घरून गेले म्हणजे काय ते मला गेले दोन दिवस समजतच नाहीये. त्यामुळे त्यावर पुढे कधीतरी! ओ ह्हो! म्हणजे घरातले लोक घरातुन गेले असे होय? पण असे का म्हणे? म्हणजे त्याचे मुळात काही दु:ख वगैरे झाले आहे का? जर झाले असले तर मग गाव कशाला जपत बसायचे? एक काहीतरी जपावे!

मरणात गुंतलो अन
जगणे सरून गेले


सुंदर शेर. खरोखरच चांगला शेर आहे.

श्रद्धांजली सग्यांची
शव गुदमरून गेले


हा आणखीन एक चांगला शेर आहे.



जगणे उपेक्षितांचे
डोळे भरून गेले


हा अनावश्यक शेर आहे असे वरवर वाटेल, पण भर सभेत मात्र महत्वाचा ठरु शकेल.

कळले कसे जगावे
मरणे मरून गेले


सुंदर शेर. मरणे मरून गेले.

थाळीत आंधळ्यांच्या
थोटे चरून गेले


चांगला शेर आहे.

हसणे तुझे मला ते...
जखमी करून गेले


काही विशेष नाही. नेहमीचाच मुद्दा!


अवघे पुरात चेले
नेते वरून गेले


आणखीन एक चांगला शेर आहे.

पुतळा उभारला....पण
नाव विसरून गेले


नाव या शब्दामधून काय म्हनायचे आहे लक्षात येत नाही. कृत्य विसरणे अभिप्रेत असावे.

ते दोन शब्द त्यांचे
दंगल करून गेले


चांगला शेर आहे.


एकंदर गझल ( फक्त आशयाच्या दृष्टीकोनातून ) चांगली - १०० पैकी ( आशयाला ) ५२

ते दोन शब्द त्यांचे
दंगल करून गेले
कलोअ चूभूद्याघ्या