असे करू नये २

शायरांचा काय झाला हाल, "वा वा"
"आणुया घोडा, मिळाला नाल वा वा"


केस ओले ठेवुनी ना लाभ काही
अत्तराचा कारखाना चालवावा


आमच्या जगण्यास आहे वर्ज्य,! कोणी
सूर्य थोडा पश्चिमेला घालवावा


प्रेम वारंवार मोडे ती, म्हणे की
बळकटी येण्यास खुंटा हालवावा


रंजनाला मांडुनी दु:खांस त्यांचा
मीच दर्जा वाढवावा, खालवावा


सावली माझी किती अजुनी दमावी?
जाऊदे आता दिवा मी मालवावा


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 

गझल: 

प्रतिसाद

सावली माझी किती अजुनी दमावी?
जाऊदे आता दिवा मी मालवावा

तिसरा शेराची कल्पना फारच सुंदर आहे

आमच्या जगण्यास आहे वर्ज्य,! कोणी
सूर्य थोडा पश्चिमेला घालवावा

तिलकधारी?
असे करू नये.
सावलीच्या शेराचा अर्थ काय रे राजा? म्हणजे जे तुला म्हणायचे आहे तेच बाकीच्यांना समजेल का? मोठ्या चर्चा करायला घेतोस, गझलियत वगैरे... मतल्याचा मूड आहे का गझलेसारखा? केस ओले मधे मतल्यात पकडलेला मूड एकदम पलटी घेऊन श्रुंगाराकडे जातो की नाही? म्हणजे वेडा कसा एकदम हसतो, एकदम रडतो असे वाटते की नाही? असे नाही करू. गझल करताना, जरी गैरमुसलअसल असली तरी एकदम इतक्या कोलांट्या घेणे चांगले नाही. दु:खाचा शेर तुझा तुला आवडला बर का? पण नशा यायला पाहिजे यार, हे असे नाही चालायचे! लोका सांगे ब्रह्मज्ञान सारखे!
आमच्या जगण्यास आहे वर्ज्य मधे आधी स्वल्पविराम देऊन मग उद्गार्वाचक चिन्हपण लिहिणे म्हणजे एक पोळी खाऊन, मधेच पान खाऊन मग परत मसालेभात खाण्यासारखे आहे की नाही?
तुला राग येण्याचे कारणच नाही, कारण इतरांना येऊ नये अशी तुझी इच्छा असते की नाही?

तिलकधारी,
मला एक कळत नाही, आपण गझल करताना हे असे सर्व विचार करत नाही काय? ही पश्चातबुद्धी का दाखवता? का आपल्याला हे दाखवायचे आहे की आपण इतके ट्रान्सपरंट आहात की स्वतःच स्वतःच्या गझलेचे मूल्यमापन करू शकता? तेही जाहीरपणे?
बाकी तुमच्या गझलेबद्दल काय बोलणार?गझल ठीक वाटली. केस ओले हा शेर आवडला.
 
 


सावली माझी किती अजुनी दमावी?
जाऊदे आता दिवा मी मालवावा


आमच्या जगण्यास आहे वर्ज्य,! कोणी
सूर्य थोडा पश्चिमेला घालवावा

हे दोन शेर चांगले आहेत, typographical mistakes सोडून.


या संकेतस्थळावरूनही आता भांडणेच होत असतील तर, एकमेकांना घालून पाडून बोलणे लिहिणे चालू असेल तर ते दुर्दैवी आहे. निखळ प्रतिक्रिया आणि आस्वादच मला तरी इथे अपेक्षित आहे. वैयक्तिकतेकडे हे सगळे जावू नये....पहा बुवा...
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

उत्तमच. ही गझल नसून हझल आहे. पण तरी ही खिल्ली उडवत उडवतही ती काही गंभीर सल्ला देवू पहात आहे. कोणी ते सगळे स्वत:वर ओढवून घेवू नये. आनंद घ्यावा.
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

दिवा शेर आवडला!
या गझलेतल्या रदीफबद्दल जाणून घ्यायला आवडेल.
"वा वा" हा रदीफ आहे का?
असला तर "वा वा" हे दोन शब्द म्हणजेच 'चाल"वावा"' मधले "वावा" असे समजायचे का?
नसला तर का नाही? एखादा सानी मतला लिहून ही सूट स्पष्ट केली आहे का?
माझ्या मते, मतल्याने निश्चित केलेल्या जमीनीनुसार, "वा वा" हाच रदीफ चालवायला हवा.