प्रेतयात्रा

कोरले भाग्यास मी वाळूत आहे
वादळाची हाक अध्यारूत आहे


ना कळू देणे मनाचे या जगाला
या उपायानेच मी शाबूत आहे


जात येतो, येत जातो,थांबतोही
गर्व सोडा श्वास ना काबूत आहे


ती पुढे सर्वात आनंदात चाले
प्रेतयात्रा ही जणू ताबूत आहे


वाटले सोडून द्यावे, फार झाले!
काय ना काव्यात जे दारूत आहे


 

गझल: 

प्रतिसाद

वाटले सोडून द्यावे, फार झाले!
काय ना काव्यात जे दारूत आहे
छान. चला, आता अमलातही आणू.

धन्यवाद! मला असे वाटले की रस्त्यावरून मिरवतात तो ताबूत असतो.
 

ताबूतचा कॉफिन हा शब्दकोशातला अर्थ बरोबर असला तरी मराठीत 'स्वतःचेच ताबूत नाचवणे' (blowing own trumpet??) असा एक वाक्प्रचार ऐकल्याचे आठवते आहे. अनेक गावांमध्ये मोहर्रमच्या दिवशी हिंदू लोकही ताबूत नाचवतात, ताबूतासमोर नवस बोलतात आणि तो  निभावून नेतात. मोहर्रम हा सण दु:खाचा आणि आनंदाचा आहे. ताबूतासमोर छाती बडवून रडणारे असतात तसे ढोल वाजवत नाचणारेही असतात.

चू.भू.दे.घे.

- आजानुकर्ण