गझल - वाटते आहे



काठ डोळ्यांचे  भिजावे  सारखे
वाटते आहे  रडावे   सारखे

मी  विचारावे तुला  काहीतरी
आणि  तू  नाही  म्हणावे  सारखे

काय या  गावात होते  आपले ?
पाय का  मागे वळावे  सारखे

वाटते पाऊस यावा एवढा
रंग भिंतींचे उडावे  सारखे

वाहुनी जावे उभे आकाश हे
दु:ख मेघांचे झरावे  सारखे.....


अनंत ढवळे



गझल: 

प्रतिसाद

वाहुनी जावे उभे आकाश हे
दु:ख मेघांचे झरावे  सारखे.....

हा शेर छनच आहे.


मी प्रदीपच्या म्हणण्याशी सहमत आहे. कवीने किती सवलत  घ्यावी ? म्हणावेस असे हवे होते.  

भाषा हे जरासे कठिण प्रकरण आहे.तूर्तास इतकेच म्हणतो (य ) !!!

वाटते पाऊस यावा एवढा
रंग भिंतींचे उडावे  सारखे

वाहुनी जावे उभे आकाश हे
दु:ख मेघांचे झरावे  सारखे.....

हे विशेष आवडले.