दुकाने

अपुले मला म्हणावे आता तरी सुखाने
ग्राहक बनून फिरलो त्याची किती दुकाने

होतो जरी निघालो शोधात संगिनीच्या
वाटेत आड आली ती सौख्यबारदाने

ज्या मैफिलीत गेलो तिथली शमा म्हणाली
"आला, हुजूर, तुम्ही, आले जुने जमाने"

रस्त्यातल्या मुलांच्या दिसली गळ्यात पाटी
"रक्तात आमच्याही तुमचीच खानदाने"

झालीत बंद मजला बहुतेक सभ्य दारे
सजलेत स्वागताला वस्तीत चोरखाने

माझ्याच उंबर्‍याला आलो न ओळखू मी
जामीन राहिली मग रंगेल तावदाने

वाटे 'मिलिंद' आता हा खेळ आवरावा
तुडवून खूप झाली शृंगारली स्मशाने

गझल: 

प्रतिसाद

एकूणच गझल मस्त झाली आहे. 

रस्त्यातल्या मुलांच्या दिसली गळ्यात पाटी
"रक्तात आमच्याही तुमचीच खानदाने"

वाव्वा! हा विचार, कल्पना माझ्या मनात आला होता. म्हणजे शेराच्या दृष्टीने नव्हे.मस्त.
झालीत बंद मजला बहुतेक सभ्य दारे
सजलेत स्वागताला वस्तीत चोरखाने

मस्त. काफिये वेगळेच आले आहेत. मस्त.

 

रस्त्यातल्या मुलांच्या दिसली गळ्यात पाटी
"रक्तात आमच्याही तुमचीच खानदाने"
वा! वा! मस्त. ही कल्पना माझ्याही मनात आली होती. पण शेर म्हणून विचार केला नव्हता.
झालीत बंद मजला बहुतेक सभ्य दारे
सजलेत स्वागताला वस्तीत चोरखाने
वावा! 
गझल फार आवडली. काफियेही वेगळे आहेत आणि चांगले आले आहेत.

 

वा मिलिंद वा !!
मस्त गझल.
ज्या मैफिलीत गेलो तिथली शमा म्हणाली
"आला, हुजूर, तुम्ही, आले जुने जमाने"

सही...
 ----अगस्ती

क्या बात है!

मस्तच् उतरलिये रे मित्रा !
सभ्य दारे... अप्रतिम् !
मक्ता... आवडला रे !

वा मिलिंदा ,

छान गझल .

ज्या मैफिलीत गेलो तिथली शमा म्हणाली
"आला, हुजूर, तुम्ही, आले जुने जमाने"

रस्त्यातल्या मुलांच्या दिसली गळ्यात पाटी
"रक्तात आमच्याही तुमचीच खानदाने"

माझ्याच उंबर्‍याला आलो न ओळखू मी
जामीन राहिली मग रंगेल तावदाने

आवडले .

(एक शंका व्य नि ने पाठवली आहे )
गझल अगदी सुन्दर झाली आहे.
'वाटे 'मिलिंद' आता हा खेळ आवरावा
तुडवून खूप झाली शृंगारली स्मशाने'

या शेरापाशी मी चांगलाच अडखळलो. माझ्या मनातला विचार मिलिंदला कसा कळला असेल? 'जे न देखे रवी, ते देखे कवी' याच नियमामुळे काय! असो. वाचताना अगदी मझा आला ही गोष्ट खरी. धन्यवाद मिलिंद! शब्द तुझे पण आवाज माझाच होता. काही दिवसांपूर्वी मी एक हिन्दी गझल लिहिली होती.
'मत कहो कुछ अब, मैं सोना चाहता हूं
सी चुके है लब, मैं सोना चाहता हूं'
असा मतला असलेली. तेच दिवस पुन्हा परत आले
 

ज्या मैफिलीत गेलो तिथली शमा म्हणाली
"आला, हुजूर, तुम्ही, आले जुने जमाने"
आवडले.