खानाबदोष

होताच रात हृदया खानाबदोष करतो
मदिरा नसेल तेव्हा गझला सदोष करतो


आरशासमोर रचतो कवितेत दु:ख आणि
 आतून वाहवाचे बेभान घोष करतो


होतात भ्याड सारे शेपूट घालणारे
ज्यांना सलाम दिवसा येताच होष करतो


या साजरी कराया भन्नाट जिंदगी ही
दु:खात सांग कोणी का व्यक्त तोष करतो 


टीका करा कितीही पर्वा करू कशाला
त्यातून जीवनाचा मी शब्दकोष करतो


समजायला हवे ना, की चूक काय आहे
कळुदेत वाचकाला, मुद्दाम दोष करतो


जर भेटला कुणाला कळवा मलाही पत्ता
माणूस जो कुणावर काही न रोष करतो



 


 


 


 

गझल: 

प्रतिसाद

हो ता च  रा   त  हृद या    खानाबदो   ष करतो
गा गा ल गा   ल  गा  गा   गा गाल गा   ल गा गा

मदि रा  नसे    ल तेव्हा     गझला सदो   ष करतो
गा   गा ल गा  ल गा गा   गा गा  ल गा  ल गा गा
आर  शा स मो   र  रचतो  कवितेत दु:  ख आणि
गा ल गा ल गा  ल  गा गा  गा गा लगा   ल गा ल      < - --- अक्षर गणवृत्त चूक आहे

विश्वस्त :  दोन दिवसात या रचनेत दुरुस्ती करा अन्यथा ही रचना विचाराधीन भागात भरती केली जाईल.

आरशासमोर रचतो कवितेत दु:ख आणि
 आतून वाहवाचे बेभान घोष करतो

ऐन्यासमोर रचतो कवितेत दु:ख आणि
 आतून वाहवाचे बेभान घोष करतो


निराशावादी असून ही (सम्जण्यात चुकत असेल तर सांगा) मस्त आहे पुढील शेर:
या साजरी कराया भन्नाट जिंदगी ही
दु:खात सांग कोणी का व्यक्त तोष करतो

त्यातून जीवनाचा मी शब्दकोष करतो
हे ही आवडले... आपल्याला मार्ग सापडतोय...