पोहरा


पंखांचा अंदाज शेवटी खरा निघाला!
वाटत होते अंबर जे; पिंजरा निघाला!

उगीच ना मी थांबवले अर्ध्यातच गाणे
त्यावेळी सूर नेमका कापरा निघाला!

ज्याने सावरले तो नव्हता कुणीच माझा
ज्याने धीर खचवला तो सोयरा निघाला

असेलही तू फुलाप्रमाणे जपले त्याला...
नवल काय पण, काटा जर बोचरा निघाला

शांतच होते, ज्या पाण्याने नाव बुडवली
मला तारले ज्याने तो भोवरा निघाला

चालवती जे देश, तयांची सभा पाहिली
झाले रंजन! तसा तमाशा बरा निघाला!

शब्दांचा तर आड तसा भरलेला होता...
कसा रिता मग अर्थाचा पोहरा निघाला?

- नचिकेत आठवले





गझल: 

प्रतिसाद

असेलही तू फुलाप्रमाणे जपले त्याला...
नवल काय पण, काटा जर बोचरा निघाला
शांतच होते, ज्या पाण्याने नाव बुडवली
मला तारले ज्याने तो भोवरा निघाला
चालवती जे देश, तयांची सभा पाहिली
झाले रंजन! तसा तमाशा बरा निघाला
अतिशय सुंदर... गझल आवडली...

 
शब्दांचा तर आड तसा भरलेला होता...
कसा रिता मग अर्थाचा पोहरा निघाला?
सुंदर.
सगळेच शेर आवडले...
काही ओळींची रचना इंग्रजी वाक्यरचनेप्रमाणे आहे ;  कारण तुम्ही निवडलेले अन्त्ययमक. (उदाहरणार्थ ः वाटत होते अंबर जे; पिंजरा निघाला...
ज्याने धीर खचवला तो सोयरा निघाला...मला तारले ज्याने तो भोवरा निघाला)
 एवढी एक बाब सोडल्यास गझल छानच झाली आहे.  शुभेच्छा...आणखी य़ेऊ द्यात...!
 
 

 

शब्दांचा तर आड तसा भरलेला होता...
कसा रिता मग अर्थाचा पोहरा निघाला?

वा! क्या बात है...सगळेच शेर अगदी छान झाले आहेत. आणखी  येऊ द्या !!!

छान गझल नचिकेत!
मतला, कापरा आणि पोहरा हे शेर फार फार आवडले!

प्रतिसादांबद्दल धन्यवाद!!
प्रदीपजी, तुमचे मार्गदर्शन पुढील लेखन करताना नक्कीच लक्षात राहिल! धन्यवाद!!
- नचिकेत आठवले 
 

शांतच होते, ज्या पाण्याने नाव बुडवली
मला तारले ज्याने तो भोवरा निघाला

चालवती जे देश, तयांची सभा पाहिली
झाले रंजन! तसा तमाशा बरा निघाला!

छान!

चांगली रचना.
दुसरा शेर फार काळजात कळ उठवेल असा...

गझल छान आहे,पण ताज्या दमाच्या कविंकडून काहीतरी अधिक अपेक्षित आहे.जीवनाच्या अफाट समुद्रात उतरायचे की  यार्-प्यार ,मोगरे ,जखमा करत बसायचे याचा निर्णय नव्या पिढीने स्वत:च घ्यावा.

चालवती जे देश, तयांची सभा पाहिली
झाले रंजन! तसा तमाशा बरा निघाला!

प्रत्येक सरकारी कार्यालयात लावण्यासारखे.

पंखांचा अंदाज शेवटी खरा निघाला!
वाटत होते अंबर जे; पिंजरा निघाला!

काही शेर चांगले आहेत, काही शेर ठेवले नसते तरी चालले असते...
कुर्पया अनंतची सूचना लक्षात घ्यावी!

... शांतच होते, ज्या पाण्याने नाव बुडवली
मला तारले ज्याने तो भोवरा निघाला
जियो!  आण्खीन गझला वाचायला आवडतिल.

पहिला आणि तिसरा शेर उत्तम आहे.

गझल छान आहे- बापू

प्रतिसाद आणि सूचनांबद्दल सर्वांना पुन्हा धन्यवाद!!

- नचिकेत

व्वा..
असेलही तू फुलाप्रमाणे जपले त्याला...
नवल काय पण, काटा जर बोचरा निघाला


शांतच होते, ज्या पाण्याने नाव बुडवली
मला तारले ज्याने तो भोवरा निघाला


चालवती जे देश, तयांची सभा पाहिली
झाले रंजन! तसा तमाशा बरा निघाला

मतला सुरेख. बोचरा आणि  पोहराही  छान.

शब्दांचा तर आड तसा भरलेला होता...
कसा रिता मग अर्थाचा पोहरा निघाला?

खुप सुन्दर..............

वाटत होते अंबर तो पिंजरा निघाला.

अतिशयच सुंदर शेर!

शांतच होते, ज्या पाण्याने नाव बुडवली
मला तारले ज्याने तो भोवरा निघाला
छान शेर

शब्दांचा तर आड तसा भरलेला होता...
कसा रिता मग अर्थाचा पोहरा निघाला?

अंतर्मुख केलंत !!

प्रसन्न शेंबेकर
"तुझी जागण्याची अदा पाहिली
फुले आरतीला उभी राहिली"

सुंदरच गझल...
असेलही तू फुलाप्रमाणे जपले त्याला...
नवल काय पण, काटा जर बोचरा निघाला
हा फार आवडला... ज..रा वेगळा वाटला
शुभेच्छा..
चुभूद्याघ्या...
***********************
वाहत्या गर्दीत माझा चेहरा पाहू नको तू
मुखवटे आहेत तेथे, त्यात हा 'नचिकेत' नाही!!