हरवला...



हाय, कसा विश्वास हरवला
समर्पणाचा ध्यास हरवला ।


तुझ्यासंगती दरवळलेला
उरातला तो श्वास हरवला ।


सातजणांना पुरुन उरे, तो
तिळाएवढा घास हरवला ।


जगण्याला धुंदी स्वप्नांची
विस्मृतीत इतिहास हरवला ।


युगाहुनी मोठा असणारा
प्रतीक्षेतला तास हरवला ।


सत्य ज्यातुनी वेचुन घ्यावे
मोहकसा आभास हरवला ।


-सतीश

गझल: 

प्रतिसाद

शेवटचे २ शेर आवडले!!

तुझ्यासंगती दरवळलेला
उरातला तो श्वास हरवला ।


सत्य ज्यातुनी वेचुन घ्यावे
मोहकसा आभास हरवला ।सतीश, ह्या दोन द्विपदी फार आवडल्या.

तुझ्यासंगती दरवळलेला
उरातला तो श्वास हरवला ।
वा...वा...

युगाहुनी मोठा असणारा
प्रतीक्षेतला तास हरवला ।
वा...वा...
 
शुभेच्छा, सतीशराव...

पुलस्ति, भट साहेब, प्रदीपजी,
अभिप्रायाबद्दल मनापासून आभार.
-सतीश