मनात आले

मनात आले गैर कुठे?
ही सत्याची सैर कुठे?

चल ये फिरुनी मिठीत ये
हे जन्माचे वैर कुठे?

ठरवुन घे तू पंथ तुझा
फिरशिल सैर न भैर कुठे?

मी जर पुसले ठसे तुझे
जाशिल मग तू खैर कुठे?

ठेवू म्हणतो भ्रष्ट युगी
चौथा 'वामन पैर'कुठे?

                        मनीषा साधू

गझल: 

प्रतिसाद

 
स्वागत...या संकेतस्थळावर.
चल ये फिरुनी मिठीत ये
हे जन्माचे  वैर कुठे?

वा...वा...वा...सुंदर.
शब्द वापरताना आणि शब्दप्रयोग करताना हिंदीचा प्रभाव जरा कमी करा  :)
चांगल्या गझला लिहाल तुम्ही !

चल ये फिरुनी मिठीत ये
हे जन्माचे वैर कुठे?
सुंदर!!!


तीनही गझलेतले शेर चांगले... काही तर अप्रतिम.. थॉट्स मांडायची पद्धत वेगळी....प्रदीपजी म्हणतात तो तंत्राचा मुद्दा पटतो हिंदीचा नाही.. त्यांनी म्हटलेल्या वाक्यात प्रभाव, स्वागत, प्रयोग हे शब्द हिंदी आहेत... मुळात मराठी भाषेतच जमीन, हवा या सारखे अनेक शब्द हिंदी वा उर्दूतून आले आहेत.. मला वाटते.. या गझल ची निकड आणि फॉर्म चे वेगळेपण म्हणून हिंदी शब्द आलेत... मनीषा साधूंच्या इतर गझलांत सद्यकालीन हिंदी शब्द नाहीत.. त्यात गालिबनेही गझलेत फारसी शब्द खूप वापरले होते....[देवनागरीत लिपीत प्रतिसाद लिहिण्याचे सहकार्य करावे. अन्यथा नाइलाजाने प्रतिसाद प्रशासित करण्याचा निर्णय घ्यावा लागेल. कळावे. -- विश्वस्त]