खिन्न शेते...

पिके वाळलेली ,उभी खिन्न शेते
स्मशानाहुनी भासती खिन्न शेते

कितीदातरी सांडले रक्त आम्ही
कितीदातरी वाळली खिन्न शेते

कडूनिंब बांधावरी अश्रु ढाळे
कशाने अशी जाहली खिन्न शेते

असे मुक्तता आत्महत्याच ज्याची
धन्याची चिता पाहती खिन्न शेते

नवे हात आलेत राबावयाला
पुन्हा जोगवा मागती खिन्न शेते...

( लेखन काळ :२००६ )
अनंत ढवळे

 

 

गझल: 

प्रतिसाद

असे मुक्तता आत्महत्याच ज्याची
धन्याची चिता पाहती खिन्न शेते
सुंदर...
प्रत्येक शेर छान.

दु:खही इतक्या सुंदरतेने, सहजतेने व्यक्त करता येते...ती गझल. आवडली....रदीफच चित्ताकर्षक आहे....
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

सुंदर...
प्रत्येक शेर  आवडला
सान्जेय
 

कितीदातरी आणि जोगवा हे शेर विशेष आवडले...

फारच सुन्दर गझल आहे.

कितीदातरी सांडले रक्त आम्ही
कितीदातरी वाळली खिन्न शेते
कडूनिंब बांधावरी अश्रु ढाळे
कशाने अशी जाहली खिन्न शेते
असे काहीसे लिहावयास हवेच होते.
नवे हात आलेत राबावयाला
पुन्हा जोगवा मागती खिन्न शेते...
परीस्थितीचे समर्पक वर्णन वाटले.
मलाही या विषयाची भुरळ पडली आहे. थोरांचे आशीर्वाद हवेत.
अजय अनन्त जोशी

कडूनिंब बांधावरी अश्रु ढाळे
कशाने अशी जाहली खिन्न शेते
वा! वा! वा!

सर्व प्रतिक्रियांबद्दल आभार. ही गझल पुढील पत्त्यावर देखील उपलब्ध आहे  :

http://marathigazals.blogspot.com/<?xml:namespace prefix = o ns = "urn:schemas-microsoft-com:office:office" /?>


 

अतिशय नाविण्यपूर्ण गझल. सुंदर.

पिके वाळलेली ,उभी खिन्न शेते
स्मशानाहुनी भासती खिन्न शेतेवा!वा!

कितीदातरी सांडले रक्त आम्ही
कितीदातरी वाळली खिन्न शेतेवा!
नवे हात आलेत राबावयाला
पुन्हा जोगवा मागती खिन्न शेते...
..

उत्तम!

वा वा!
फारच छान गझल.
--योगेश वैद्य