. . . जशी तू

कल्पनेत माझ्या आलीस जशी तू
भावनेत माझ्या होतीस जशी तू


पाश सैल झाले माझ्या सलगीचे
बंधनात त्याच्या गेलीस जशी तू


मीच राखले वेडे भान दिसाचे
कात टाकण्या कासावीस जशी तू


येत कोवळ्या किरणां बाज रुपेरी
प्रीत आज हृदयीं नेलीस जशी तू


मोर स्वागता आहे सज्ज वसंता
रोज रातच्या तैनातीस जशी तू

गझल: 

प्रतिसाद

प्रिय अनंंत जोशी,

मीच राखले वेडे भान दिसाचे
कात टाकण्या कासावीस जशी तू

मोर स्वागता आहे सज्ज वसंता
रोज रातच्या तैनातीस जशी तू

ह्या दोन द्विपदी विशेष आवडल्या. गझल छान आहे.

येत कोवळी ऊन्हातून रुपेरी
प्रीत हृदयीं ही नेलीस जशी तू

ह्या द्विपदीत बहुधा ऊन्हातून आणि हृदयी ह्या दोन शब्दांत ऊ आणि हृ ऱ्हस्वाचे दीर्घ होत आहेत, असे वाटते. टाळण्याचा प्रयत्न करावा. पुढील गझललेखनासाठी शुभेच्छा. प्रतिसाद देण्यासाठी झालेल्या उशिरासाठी क्षमस्व.

बदल केला आहे.

या रंगातील अक्षरांत बदल केला आहे. बदल करण्यास खूपच उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व
कलोअ चूभूद्याघ्या

बरी वाटली तशी!