हातघाई

एकट्याची हातघाई चालली
ही स्वतःसंगे लढाई चालली


रे भिकार्‍यांनो,लुटा ही देवळे
देवतांची गाइगाई चालली


बांधतो आहे बुटाचे बंद मी
फाटक्या चपलेत आई चालली


घेऊनी थैली रिकामी परतलो
शेर ना माझी रुबाई चालली


बंद कर तू नाकडोळे आपले
बंगल्यामध्ये मिठाई चालली


वाचणारा एकही नाही मला
चालली, वायाच शाई चालली!


-गणेश एस्.एम्. धामोडकर

गझल: 

प्रतिसाद

गणेश, उत्तम गझल. 
बांधतो आहे बुटाचे बंद मी
फाटक्या चपलेत आई चालली

हा शेर नेहमीच लक्षात राहील.

एकट्याची हातघाई चालली
ही स्वतःसंगे लढाई चालली
आवडले.
बांधतो आहे बुटाचे बंद मी
फाटक्या चपलेत आई चालली
वा. हे खूप आवडले.

गणेश....
बांधतो आहे बुटाचे बंद मी
फाटक्या चपलेत आई चालली
अतिशय छान...या दोन ओळींत तू काय काय सांगितलं नाहीस...? सगळंच सांगितलंस...लिहीत राहा....