आसवे....अमित वाघ.

एवढी रक्तात न्हाली आसवे..
आरसा पाहून भ्याली आसवे..

पापण्यांना चुंबिले तू ज्या क्षणी..
लाजली हासून गाली आसवे..

भेटलो जेव्हा तिला स्वप्नात मी..
बंद डोळ्यातून आली आसवे..

मी तिचा दावा कसा मानू खरा..
ढाळल्याने फक्त साली आसवे..

पत्र ते कोरे कुठे होते तिचे...
वाचली मी दोन खाली आसवे..

अमित वाघ.
'गुरुमंदिर', सुधीर कॉलनी,अकोला-444001.
मो. नं. : 9850239882.
www.gazalnavihotanna.blogspot.com
www.gajalnahihotito.blogspot.com

गझल: 

प्रतिसाद

अमित, मतला आणि शेवटचा शेर खासच!!
दावा शेरात 'साली' शब्दाचे प्रयोजन अनिवार्य आणि सहज वाटत नाही... आणि म्हणून खटकते. चु.भू.दे.घे.

अमित,

मी पुलस्तिंशी अंशत: सहमत आहे.
शेर चालून जाईल असा आहे.
तरीही, अजून एखादा शेर झाल्यास हा बाजूला ठेवावा, अशी विनंती. 

शेवटचा शेर एकदम उर्दू तबियतीतला. 

[quote]अमित, मतला आणि शेवटचा शेर खासच!!
दावा शेरात 'साली' शब्दाचे प्रयोजन अनिवार्य आणि सहज वाटत नाही... आणि म्हणून खटकते. चु.भू.दे.घे.[/quote]

हेच म्हणतो.

पापण्यांना चुंबिले तू ज्या क्षणी..
लाजली हासून गाली आसवे..

भेटलो जेव्हा तिला स्वप्नात मी..
बंद डोळ्यातून आली आसवे..

पत्र ते कोरे कुठे होते तिचे...
वाचली मी दोन खाली आसवे.... हे शेर आवडलेत
-मानस६

दावा शेरात 'साली' शब्दाचे प्रयोजन अनिवार्य आणि सहज वाटत नाही... आणि म्हणून खटकते.

मलाही मान्य आहे..
आपल्या सर्वांनाच धन्यवाद...

आपला 
अमित वाघ.
'गुरुमंदिर', सुधीर कॉलनी,अकोला-444001.
मो. नं. : 9850239882.
www.gazalnavihotanna.blogspot.com
www.gajalnahihotito.blogspot.com

पापण्यांना चुंबिले तू ज्या क्षणी..
लाजली हासून गाली आसवे..


पत्र ते कोरे कुठे होते तिचे...
वाचली मी दोन खाली आसवे..


वावावा! अप्रतिम शेर!
साली बद्दल पुलस्तिंशी सहमत आहे.
पु. ले. शु.
 
- चक्रपाणि जीवन चिटणीस