गझले तुज अर्पण हे तन-मन्-धन...

गझले तुज अर्पण हे तन-मन्-धन
वाहियले तुजसाठी मी... जीवन


जगण्याचा अर्थ खरा लावलास
प्रतिभेचे फुलविलेस.. नंदनवन


घेवुन सल काळजात मी फिरतो
अन माझ्या दु:खाचे.. तू सांत्वन


तेज असे तुझियातच.. विश्वाचे
तार्‍यासम झळके माझे प्राक्तन


शालिनता आणलीस जीवनात
नम्र किती झाले... माझे वर्तन


हा प्रभाव माझ्यावर गझलेचा
फक्त तिचे बोल ऐकते हे मन


ही सदैव जीवनात हेळसांड
गझल करी मातेसम संगोपन


जीवन जणु शेर दोन ओळींचा
मात्र त्यात दडलेला अर्थ गहन


जग सोडुन जाइन मी हे तेव्हा
करशिल या नावाचे तू 'चंदन'


- जनार्दन केशव म्हात्रे
२/ खलिफा निवास, गांधी नगर, जुना बेलापूर रोड,
कळवा-ठाणे ४००६०५.  भ्रमणध्वनी: ९३२३५५५६८८

गझल: 

प्रतिसाद

शालिनता आणलीस जीवनात
नम्र किती झाले... माझे वर्तन

सुंदर शेर !!

जीवनात आनंदाची उधळण करणारी गझल आवडली. ट्रकभर उसापासुन तीन ग्लास रस काढण्याच्या प्रयत्नांच्या जवळ जातो आहेस.

जगण्याचा अर्थ खरा लावलास
प्रतिभेचे फुलविलेस.. नंदनवन

जीवन जणु शेर दोन ओळींचा
मात्र त्यात दडलेला अर्थ गहन

तुझ्या सर्व गझलांना माझ्या शुभेच्छा अर्पण...!