अखाडा



जिंदगी झाली अखाडा
रोज खस्ता, रोज राडा

गारवा नाही मिळाला
सोसला नुसता उकाडा

दु:खितांचे गीत माझे
हा न धेंडांचा पवाडा

सूर्य क्रांतीचा उगवला
खोल रे आता कवाडा !

काय मी मेलो कळेना?
भोवती पडला गराडा

हासतो माझ्यासवे मी
पाहुनी माझा चुराडा

वेदना शब्दात आली
तूच गझले कर निवाडा

 --- धोंडोपंत



 


गझल: 

प्रतिसाद

देत जा ऐशाच गजला
नकोस धोंडो करुस खाडा

धोंडोपंत, गझल भारी आहे.

जिंदगी झाली अखाडा
रोज खस्ता, रोज राडा
वाव्वा!

काय मी मेलो कळेना?
भोवती पडला गराडा
वाव्वा!

हासतो माझ्यासवे मी
पाहुनी माझा चुराडा
वाव्वा!

हे तीन शेर नेहमी लक्षात राहातील. आता थांबू नका!




चित्तशी सहमत!

काय मी मेलो कळेना?
भोवती पडला गराडा...

हा शेरही अप्रतिम. अजब

व्वा !

गारवा नाही मिळाला
सोसला नुसता उकाडा

सुंदर शेर !!

हे तीन शेर फारच मस्त! पंत, पुढची गझल येऊ द्या...

जिंदगी झाली अखाडा
रोज खस्ता, रोज राडा

सुंदर...!

दु:खितांचे गीत माझे
हा न धेंडांचा पवाडा

छान...!

वा, धोंडोपंत, येऊ द्या अजून गझला...वाट पाहत आहे...

वेदना शब्दात आली
तूच गझले कर निवाडा

वेदना शब्दात आली
तूच गझले कर निवाडा


छान आहे हा शेर.